केरळ राज्यातील साडे सहा लाखांपेक्षा अधिक लोकांना आपल्या वेढ्यात घेणारा भयावह जलप्रलय !

संकटकाळात लोक सरकारवर पूर्णपणे अवलंबून असतात; पण सरकारकडून साहाय्य पुष्कळ उशिराने चालू झाले. अलप्पू जिल्ह्यातील कुट्टनाड परिसरात महिन्याभरापासून पाणी होते; पण सरकारकडून तेथे साहाय्यकार्य पुष्कळ उशिराने चालू झाले.

भगवान परशुराम यांची कृपा लाभलेल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उच्चकोटीचा भाव असलेल्या म्हापसा (गोवा) येथील पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजी (वय ८१ वर्षे) सद्गुरुपदी विराजमान !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उच्चकोटीचा भाव असलेल्या म्हापसा (गोवा) येथील पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजी या सद्गुरुपदी विराजमान झाल्याची घोषणा सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केली. 

श्री विठ्ठल आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार श्रद्धा असलेले पंढरपूर येथील ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

विठ्ठलाप्रती उत्कटभक्ती असलेले पंढरपूर येथील ह.भ.प. बाळासाहेब बडवे महाराज (वय ७२ वर्षे) हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फे-यांतून मुक्त झाल्याची घोषणा १ ऑगस्ट या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आली.

‘सनातन शॉप’च्या गुजराती भाषेतील संकेतस्थळाचे अनावरण पू. पृथ्वीराज हजारे यांच्या हस्ते संपन्न

गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी, म्हणजेच २७ जुलै या दिवशी सनातन-निर्मित ग्रंथांच्या विक्रीचे ‘ऑनलाईन’ संकेतस्थळ ‘सनातन शॉप’च्या गुजराती भाषेतील संकेतस्थळाचे अनावरण सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांच्या हस्ते येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आले.

खडतर प्रसंगांना सामोरे जाऊनही सतत कृतज्ञताभावात असणार्‍या श्रीमती सत्यवती दळवीआजी (वय ८३ वर्षे) संतपदी विराजमान !

गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी सनातनच्या देवद येथील आश्रमात झालेल्या चैतन्यदायी सोहळ्यात पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांनी श्रीमती सत्यवती शांताराम दळवीआजी (वय ८३ वर्षे) या संतपदी विराजमान झाल्याची भावपूर्ण घोषणा केली.

कृतज्ञताभावात असलेले आणि श्री गुरूंचा स्थूल अन् सूक्ष्म सत्संग नित्य अनुभवणारे सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वेमामा !

वर्ष १९९६ मध्ये सांगली येथे मी सनातनची पहिली गुरुपौर्णिमा अनुभवली आणि तेव्हापासून मी क्रियाशील होऊन सेवेला आरंभ केला.

बंगालमधील डॉ. शिवनारायण सेन यांनी ६५ टक्के, तर डॉ. कौशकचंद्र मल्लिक आणि तमिळनाडू येथील अर्जुन संपथ यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

बंगालसारख्या प्रतिकूल परिस्थितीत धर्मशास्त्राची ज्योत तेवत ठेवण्याचे कार्य करणारे शास्त्रधर्म प्रचारसभेचे सचिव डॉ. शिवनारायण सेन यांनी ६५ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, असे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हिंदू अधिवेशनात घोषित केले.

कतरास (झारखंड) येथील प्रदीप खेमका, मुंबई (महाराष्ट्र) येथील सौ. संगीता जाधव आणि कर्नाटकमधील रमानंद गौडा संतपदी विराजमान

झारखंड राज्याचे धर्मप्रसारक श्री. प्रदीप खेमका (वय ५९ वर्षे), मुंबई-ठाणे-रायगड आणि गुजरात राज्याच्या प्रसारसेविका सौ. संगीता जाधव (वय ४८ वर्षे) आणि कर्नाटक राज्याचे धर्मप्रसारक श्री. रमानंद गौडा (वय ४२ वर्षे) हे ७१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून समष्टी संतपदी विराजमान झाले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या समवेत मी यापुढे नेहमी कार्य करीन ! – स्वामी संवित् सोमगिरीजी महाराज

हिंदु राष्ट्र स्थापनेचे पवित्र कार्य हाती घेतल्याविषयी मी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना धन्यवाद देतो. हे कार्य मौलिक असल्याने तुमच्यासमवेत मी यापुढे नेहमी कार्य करीन !…

परखड वाणीतून धर्मप्रबोधन करणारे पुणे येथील ज्येष्ठ समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांचा देहत्याग !

प्रवचनांमधून हिंदूंमधील धर्मचेतना जागवणारे, धर्मद्रोह्यांचा सडेतोड वैचारिक समाचार घेणारे आणि तितक्याच रसाळ वाणीतून जिज्ञासूंना साधनेच्या मार्गाला लावणारे ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांनी २२ एप्रिलला सकाळी ९.१५ वाजता देहत्याग केला.