गंगास्नानाविषयी संभ्रम निर्माण करणार्‍या हिंदुद्वेष्ट्यांचे षड्यंत्र यशस्वी होऊ देऊ नका ! – सनातन संस्था

समस्त सनातनधर्मी हिंदु समाज कुंभपर्वात गंगास्नान करणे, याला पुण्यकारी मानतो. कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोट्यवधी भाविक गंगानदीत डुबकी घेऊन त्यांच्या पापांचे क्षालन करतात.

सनातन धर्म, ग्रंथ आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी कायम सतर्क रहावे ! – शंकराचार्य स्वामी श्री स्वरूपानंद सरस्वती महाराज

सनातन धर्म, ग्रंथ आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी कायम सतर्क रहावे.

कुंभमेळ्यातील सनातनच्या ‘धर्मशिक्षण’ आणि ‘राष्ट्र-धर्म रक्षण’ यांसंबंधीच्या फलक प्रदर्शनास जिज्ञासू, साधू, संत-महंत यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सनातन संस्थेने सेक्टर १५, मोरी मार्ग-मुक्ती मार्गाच्या चौकात ‘धर्मशिक्षण तथा राष्ट्र-धर्म रक्षणासंबंधी फलक प्रदर्शना’चे आयोजन केले आहे.

सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाची दूरदर्शन वृत्तवाहिनी आणि दैनिक ‘हिंदुस्थान टाइम्स’कडून दखल !

येथील सनातन संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य ग्रंथ आणि फ्लेक्स प्रदर्शनास दूरदर्शनसह विविध वृत्तवाहिन्या, ‘एन्बीटी’ (नवभारत टाइम्स), ‘जनसत्ता ऑनलाइन पोर्टल’, ‘हिंदुस्थान टाइम्स’ या प्रथितयश वर्तमानपत्रांनी दखल घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

अयोध्या येथे राममंदिराची उभारणी होण्यासाठी प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर साधू-संत आणि सनातन संस्था यांचे उत्स्फूर्त अभियान

येथील शाही स्नान मार्ग, तसेच संगमाच्या ठिकाणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने अयोध्या येथे राममंदिराची उभारणी होण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ अशाप्रकारे श्रीरामाच्या नामजपाचे अभियान १५ जानेवारीला राबविण्यात आले.

सनातन संस्थेच्या वतीने साधू-संतांचे स्वागत : साधूंकडून सनातनचा जयघोष

येथील पहिल्या राजयोगी स्नानाच्या पार्श्‍वभूमीवर पहाटे ४ वाजता आखाड्यांच्या शोभायात्रा वाजत-गाजत त्रिवेणी संगमावर निघाल्या. त्या वेळी सनातनच्या साधकांनी हातात फलक धरून त्यांचे स्वागत केले. स्नानासाठी जाणार्‍या अनेक साधूंनीही ‘सनातन की जय’, ‘सनातन धर्म की जय’, असा जयघोष केला.

वैष्णव आखाड्यांच्या ध्वजारोहणाच्या वेळी सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संतांचे स्वागत !

५ जानेवारी या दिवशी कुंभमेळाक्षेत्री श्री पंच दिगंबर अनी आखाडा, श्री पंच रामान्दीय निर्वाणी आखाडा आणि श्री पंच रामान्दीय निर्मोही आखाडा या ३ प्रमुख वैष्णव आखाड्यांचे ध्वजारोहण भावपूर्ण अन् उत्साहात पार पडले.

‘झी २४ तास’ या वृत्तवाहिनीवरील ‘रोखठोक’ कार्यक्रमात ‘देवाला कपड्याचे वावडे ?’ या विषयावरील चर्चासत्रात सनातनचा सहभाग

सरकारने ‘टेम्पल अक्ट’ हा नवीन कायदा देवस्थान समितीला दिलेला आहे. त्यामुळे मंदिर देवस्थान समितीला योग्य निर्णय घेण्याचा अधिकार आहे. तोकडे कपडे परिधान न करण्याविषयीचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे आवाहन अतिशय योग्य आहे.

केरळ राज्यातील साडे सहा लाखांपेक्षा अधिक लोकांना आपल्या वेढ्यात घेणारा भयावह जलप्रलय !

संकटकाळात लोक सरकारवर पूर्णपणे अवलंबून असतात; पण सरकारकडून साहाय्य पुष्कळ उशिराने चालू झाले. अलप्पू जिल्ह्यातील कुट्टनाड परिसरात महिन्याभरापासून पाणी होते; पण सरकारकडून तेथे साहाय्यकार्य पुष्कळ उशिराने चालू झाले.

भगवान परशुराम यांची कृपा लाभलेल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उच्चकोटीचा भाव असलेल्या म्हापसा (गोवा) येथील पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजी (वय ८१ वर्षे) सद्गुरुपदी विराजमान !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती उच्चकोटीचा भाव असलेल्या म्हापसा (गोवा) येथील पू. (श्रीमती) सुशीला आपटेआजी या सद्गुरुपदी विराजमान झाल्याची घोषणा सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केली.