सनातन धर्मातील सर्व पंथांनी भेदभाव सोडून कार्य केल्यास यश निश्‍चित मिळेल ! – महामंडलेश्‍वर श्री स्वामी गिरिधरगिरी महाराज, हरिद्वार, उत्तराखंड

आपण सर्व कार्य करत असतांना सर्वजण बरोबरीचे अधिकारी आहोत. येथे कोणी लहान-मोठा असत नाही, असे प्रतिपादन हरिद्वार येथील श्रीकृष्ण निवास तथा पूर्णानंद आश्रमाचे महामंडलेश्वर श्री स्वामी गिरिधरगिरी महाराज (छोटे महाराज) यांनी ३१ जानेवारी या दिवशी येथे केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याप्रमाणे सर्व संतांनी कार्य करायला हवे ! – स्वामी भास्करतीर्थ महाराज, महामंत्री, अखिल भारतीय संत समिती, ओडिशा

माता गंगा नदीच्या किनारी हिंदूंचे रक्षण आणि जागृती यांसाठी हे प्रदर्शन लावले आहे. अनेक संकटे आली, तरी तुम्ही हिंदु धर्माची परंपरा आणि हिंदू यांच्यासाठी कार्य करत आहात. सर्व संतांनी असे कार्य करायला हवे. सध्या भारतात आदिवासी भागांतील आणि इतर ठिकाणचे हिंदू हे ख्रिस्ती होत आहेत.

धर्मशिक्षण प्रदर्शनातून सर्वांना सकारात्मक ऊर्जा मिळते ! – आचार्य हेमेंद्र प्रसाद, स्वामीनारायण संप्रदाय, गुजरात

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लावलेल्या धर्मशिक्षण प्रदर्शनातून सर्वांना सकारात्मक ऊर्जा मिळते. ती सर्वांनी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन गुजरात येथील स्वामीनारायण संप्रदायाचे आचार्य हेमेंद्र प्रसाद यांनी १ फेब्रुवारी या दिवशी येथे केले.

सनातन संस्थेचे प्रदर्शन दिव्य असून त्यातून मनुष्याच्या जीवनात सत्य आणि सात्त्विकता यांची वृद्धी होत आहे – डॉ. शिवनारायण सेन

हिंदु जनजागृती समितीने कुंभनगरीत लावलेले धर्मशिक्षण प्रदर्शन दिव्य असून ते पाहिल्याने मनुष्याच्या जीवनात सत्य आणि सात्त्विकता यांची वृद्धी होत आहे, असे प्रतिपादन शास्त्र धर्म प्रचार सभेचे महासचिव ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. शिवनारायण सेन यांनी २ फेब्रुवारी या दिवशी येथे केले.

कुंभनगरीतील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला पू. पूर्णदास महाराज यांची भेट

३१ जानेवारी या दिवशी कुंभनगरीतील सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन आणि हिंदु जनजागृती समितीचे धर्मशिक्षण फलक प्रदर्शन यांना राजस्थान येथील रामानंदी वैष्णव संप्रदायाचे पू. पूर्णदास महाराजयांनी भेट दिली.

प्रयागराज : गंगा रक्षणाविषयी जागृती व्हावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने ‘गंगारक्षण’ या विषयावर प्रदर्शन आयोजित !

गंगा नदीत दूषित पाणी जाणार नाही, यासाठी प्रयत्न करणे, हेच ख-या अर्थाने गंगारक्षण आहे. दुर्दैवाने ‘नमामि गंगे’ प्रकल्पाच्या अंतर्गत सरकारकडून या दृष्टीकोनातून अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत, अशी खंत ‘गंगा आव्हान आंदोलना’चे प्रणेते श्री. हेमंत ध्यानी यांनी कुंभनगरी येथे व्यक्त केली.

सनातनच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदु संस्कृती जतन करण्याचे कार्य होत आहे ! – ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे, संत तुकाराम महाराजांचे वंशज, पंढरपूर

सनातन संस्थेने भारतीय संस्कृतीवर आधारित प्रदर्शन लावल्यामुळेे आपल्या परंपरांचे महत्त्व लोकांना कळत आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदु संस्कृती जतन करण्याचे कार्य होत आहे, असे प्रतिपादन संत तुकाराम महाराज यांचे वंशज आणि पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे यांनी येथे केले.

सनातन संस्थेच्या प्रदर्शनातून साधना, राष्ट्र व धर्मरक्षण करण्यासाठी अनेकांना ज्ञान मिळत आहे – आदिश्‍वर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्‍वर महाराज

सध्या स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जाऊ लागले आहे. यामुळेच अनेक अनर्थ होऊ लागले आहेत. राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य यशस्वी होण्यासाठी ही वाईट प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे, असे प्रतिपादन सातारा येथील तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर मठाचे श्री.ष.ब्र.प्र.१०८ आदिश्वर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज यांनी येथे केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न ! – साध्वी डॉ. प्राची

सनातन संस्थेकडून सनातन संस्कृतीला वाचवण्यासाठी चांगले प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन विश्‍व हिंदु परिषदेच्या साध्वी डॉ. प्राची यांनी येथे केले.

भारत हिंदु राष्ट्र बनले पाहिजे ! – श्री महंत हरिहरानंद भारतीजी महाराज

जगात अन्य धर्मियांची राष्ट्रे आहेत; परंतु हिंदूंचे कोणतेही राष्ट्र नाही, ही दु:खाची गोष्ट आहे. भारत हिंदु राष्ट्र बनले पाहिजे. यासाठी सरकारकडे मागणी केली पाहिजे, असे प्रतिपादन श्री महंत हरिहरानंद भारतीजी महाराज यांनी प्रयागराज येथे केले.