आयकर परताव्यासाठी येणार्या संदेशापासून सावध रहा आणि स्वतःची फसवणूक टाळण्यासाठी अशा संदेशाकडे दुर्लक्ष करा !
मार्चच्या अखेरपर्यंत आयकर विवरणपत्र भरण्यात येत असते आणि त्यानंतर परतावा (रिफंड) मिळवण्यात येतो. गेल्या काही काळापासून परताव्याचा हक्क सांगण्यासाठी भ्रमणभाषवर एक संदेश येत आहे. अशा संदेशापासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे.