धरणक्षेत्रात रहाणार्यांनो, स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी सतर्क रहा !
पावसाळा चालू झाल्यावर धरणे फुटण्याच्या घटना देशभरात कुठे ना कुठे घडत असतात. विशेष म्हणजे या धरणांच्या सुरक्षिततेचे परीक्षण करण्यासाठी स्वतंत्र शासकीय विभाग आहेत; पण या विभागांनी धरणे फुटण्यापूर्वीच जनतेला सतर्क करून हानी रोखली, असे कधी घडत नाही.