सनातनचे ग्रंथ ‘ई-बुक’ स्वरूपात उपलब्ध करण्याच्या सेवेत योगदान द्या !

सध्या समाजामध्ये संगणक, भ्रमणभाष इत्यादींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे सनातनचे ग्रंथ समाजाला ‘ई-बुक’ स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मोठी सेवा उपलब्ध झाली आहे. (‘ई-बूक’ : एखाद्या पुस्तकाचे ‘डिजिटल’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक’ स्वरूपातील रूपांतर !) या सेवेसाठी या क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती आणि साधक यांची आवश्यकता आहे.

साधकांनो, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग आणि गुरुकृपायोग या योगमार्गांनुसार प्रत्येक सेवा करून शीघ्र आध्यात्मिक उन्नती करा !

आश्रमातील, तसेच प्रसारात सेवा करणारे साधक विविध सेवा करतात. मिळालेली प्रत्येक सेवा साधकांनी कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग आणि गुरुकृपायोग या योगमार्गांनुसार केली, तर ती परिपूर्ण अन् भावपूर्ण होईल. ‘या योगमार्गांनुसार सेवा कशी करावी ?’, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

साधकांनो, ‘आध्यात्मिक त्रासामुळे नव्हे, तर स्वतःतील स्वभावदोष आणि अहं यांच्या पैलूंमुळे चुका होत आहेत’, हे लक्षात घेऊन त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करा !

खरेतर कोणतीही चूक आध्यात्मिक त्रासामुळे नव्हे, तर साधकांमधील स्वभावदोष वा अहं यांमुळे होत असते. आध्यात्मिक त्रासाचे कारण पुढे केल्यास साधनेची हानी होते.

साधकांना सेवेसाठी साहाय्यक असलेल्या भ्रमणभाष, संगणक,‘इअरफोन’ इत्यादी उपकरणांवर वाईट शक्तींनी आक्रमण केल्यामुळे साधकांच्या सेवेत अडथळे निर्माण होणे

सनातन संस्थेचे धर्मप्रसाराचे कार्य व्यापक स्तरावर शीघ्र गतीने चालू आहे. साधकांची सेवा गतीने होण्यासाठी भ्रमणभाषचा वापर करणे अपरिहार्य झाले आहे. त्यामुळे अनिष्ट शक्ती उपकरणांवर आक्रमणे करून धर्मप्रसाराचे कार्य आणि सेवा यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे आणत आहेत.

साधकांनो, आध्यात्मिक त्रासाच्या तीव्रतेत सतत पालट होत असल्याने वेळोवेळी त्रासाची लक्षणे अभ्यासून ‘किती घंटे उपाय करावेत ?’, याविषयी उत्तरदायी साधकांना विचारा !

साधक प्रतिदिन नामजपादी उपाय करतात. साधकांनी स्वतःला होणा-या त्रासाच्या लक्षणांचा, उदा. न सुचणे, डोके जड होणे, अनावश्यक विचार करणे, याचा साधकांनी वेळोवेळी अभ्यास करायला हवा. यासंदर्भात पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.

साधकांनो, सध्या होणार्‍या विविध त्रासांवर मात करण्यासाठी स्वतःची साधना वाढवा !

‘सध्या अनेक साधकांचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास वाढले आहेत. त्रासांचे दिवसेंदिवस वाढत जाणारे हे प्रमाण आपत्काळ समीप आल्याचे दर्शवत आहे. ‘या आपत्काळातून तरून जाण्यासाठी स्वतःची साधना वाढवणे, हाच एकमेव पर्याय आहे’, हे साधकांनी लक्षात घ्यावे. सर्वांनी दिवसभरातील अधिकाधिक वेळ सत्सेवेत रहाण्यासाठी प्रयत्न करावेत. व्यष्टी साधनेचे, विशेषतः ‘भावजागृतीचे प्रयत्न कसे होतील ?’, याकडेही अधिक लक्ष … Read more

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले विविध ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच देवतांची चित्रे आणि नामपट्ट्या समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा !

नवरात्रीच्या काळात देवीची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने करता येऊन भक्तांना देवीतत्त्वाचा लाभ अधिकाधिक व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.

साधकांनो, भवसागरातून तरून जाण्यासाठी प्रतिदिन भावपूर्ण नामजप करून आध्यात्मिक बळ वाढवा !

दिवसेंदिवस आपत्काळाची तीव्रता आणि वातावरणातील रज-तम वाढत आहे. आपत्काळाचा सामना करत भवसागरातून तरून जाण्यासाठी नाम हाच आधार असल्याने साधकांनी प्रतिदिन भावपूर्ण नामजप करून आध्यात्मिक बळ वाढवावे. साधकांनी नामजपाचा आढावा व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या साधकास द्यावा.

पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात करावयाचा दत्ताचा सुधारित नामजप !

‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन करावयाचा सुधारित नामजप ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ असा आहे. हा नव्याने ध्वनीमुद्रित केलेला नामजप सनातन संस्थेच्या sanatan.org या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

सनातनच्या वाढत्या कार्यात बांधकाम क्षेत्रातील सेवांसाठी स्थापत्य अभियंत्यांची आवश्यकता !

सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ राहून मनुष्यजन्माचे सार्थक करण्याच्या ध्येयाने प्रेरित होणार्‍या साधकांची संख्या वाढत आहे. साधकांची वाढती संख्या पहाता सध्याची आश्रमाची वास्तू अपुरी पडत आहे. त्यामुळे नवीन वास्तूच्या निर्मितीसाठी स्थापत्य अभियंत्यांची (‘सिव्हिल इंजिनीयर’ची) आवश्यकता आहे.