सनातनच्‍या सात्त्विक मूर्ती सिद्ध करण्‍याच्‍या सेवेत योगदान द्या !

जे साधक, हितचिंतक, वाचक आदींना मूर्तीकलेविषयी ज्ञान आहे किंवा ज्‍यांची हे सर्व साधना म्‍हणून शिकण्‍याची अन् सेवा करण्‍याची इच्‍छा आहे, अशांनी त्‍यांची नावे जिल्‍हासेवकांच्‍या माध्‍यमातून कळवावी.

‘मकरसंक्रांतीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने वाण म्हणून देणे’, ही चिरंतन आणि सर्वाेत्तम भेट असल्याने त्यासाठी जिज्ञासूंना प्रवृत्त करा !

साधकांनी वाचक, जिज्ञासू, महिला मंडळे, तसेच बचत गट आदींना लवकरात लवकर संपर्क करून सात्त्विक वाण देण्याचे महत्त्व सांगावे आणि सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ अन् उत्पादने वाण म्हणून देण्यास प्रवृत्त करावे.

पैशांची देवाण-घेवाण, आर्थिक किंवा भूमीचे व्यवहार करणे, तसेच विवाह जुळवणे आदी वैयक्तिक गोष्टी आपल्या जबाबदारीवर कराव्यात !

सनातन संस्था गेली २५ वर्षे अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहे. या कालावधीत साधक, वाचक, हितचिंतक यांचा परस्पर परिचय होऊन ते अध्यात्म अन् साधना यांसह वैयक्तिक स्तरावर काही व्यवहार करत असल्यासे निदर्शनास आले आहे…

कुंभपर्वाच्या सेवेसाठी सुस्थितीतील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता !

धर्मप्रसाराच्या सेवेसाठी १५.१२.२०२४ पासून ५.३.२०२५ या काळात कुंभक्षेत्री विविध सेवांसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांची आवश्यकता आहे. ‘डिझेल’वर चालणारी आणि ४ – ५, तसेच ८ – १० व्यक्ती बसू शकतील, एवढ्या आसनक्षमतेची चारचाकी वाहने आणि शक्यतो ‘सेल्फ स्टार्ट’ असलेली दुचाकी वाहने आवश्यक आहेत.

धनत्रयोदशी निमित्त धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

‘२९.१०.२०२४ या दिवशी ‘धनत्रयोदशी’ आहे. ‘धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी ! या दिवशी मनुष्याचे सुरळीतपणे पोषण होण्यासाठी साहाय्य करणार्‍या धनाची (संपत्तीची) पूजा केली जाते. व्यापारी लोकांच्या दृष्टीने धनत्रयोदशीपासून नववर्षाला आरंभ होत असल्याने ते या दिवशी तिजोरीचे पूजन करतात. सत्कार्याला धन अर्पण करणे, हीच लक्ष्मीची खरी पूजा होय.

शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ग्रंथ अन् लघुग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !

विद्यार्थ्यांना पारितोषिक म्हणून सनातनने प्रसिद्ध केलेले ‘बालसंस्कार’ या ग्रंथमालिकेतील, तसेच अन्य ग्रंथ दिल्यास त्यांच्या मनावर सुसंस्कारांचे महत्त्व बिंबण्यास साहाय्य होईल. ‘व्यावहारिक जीवनात यशस्वी बनण्यासह गुणी अन् आदर्श होण्यासाठी काय करावे ?’, याविषयीची अमूल्य माहिती या ग्रंथांत दिली आहे.

प्रयागराज येथे होणार्‍या कुंभपर्वासाठी तेथील स्वतःची वास्तू उपलब्ध करून देऊन धर्मकार्यात सहभागी व्हा !

जे साधक, वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी धर्मप्रसाराच्या सेवांकरता प्रयागमधील स्वतःची वास्तू विनामूल्य वापरण्यासाठी अथवा अल्प भाडे तत्त्वावर देऊ शकतात, त्यांनी कृपया कळवावे.

अपघातांपासून रक्षण होण्‍यासाठी प्रतिदिन नामजपादी उपाय करा !

‘सनातनचे राष्‍ट्र आणि धर्म जागृतीचे कार्य जसजसे वाढत आहे, तसतसे या कार्यात अडथळे आणण्‍यासाठी वाईट शक्‍ती मोठ्या प्रमाणात कार्यरत झाल्‍या आहेत. साधकांनी मात्र वाईट शक्‍तींच्‍या आक्रमणांपासून रक्षण होण्‍यासाठी साधना आणि आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय वाढवणे अत्‍यावश्‍यक आहे.

साधकांनो, पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेच्या दृष्टीने आश्रमातील सेवांमध्ये सहभागी व्हा !

‘पावसाचे पाणी आत येऊ नये’, यासाठी फ्लेक्स किंवा प्लास्टिक लावणे; कपडे वाळवण्यासाठी, तसेच साहित्य आणि वाहन ठेवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या निवारा शेड बनवणे; …. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करणे इत्यादी सेवांसाठी शारीरिक क्षमता असलेल्या साधकांची आवश्यकता आहे.

सनातनच्या आश्रमांत पावसाळ्याच्या पूर्वसिद्धतेसाठी खालील साहित्याची आवश्यकता !

आश्रम परिसरातील सर्व साहित्य सुस्थितीत रहाण्याकरता तात्पुरत्या निवारा शेड बनवायच्या आहेत. त्यासाठी फ्लेक्स, प्लास्टिक आणि ‘सिलपोलिन’ यांची, तसेच लोखंडी अन् प्लॅस्टिक पत्र्यांची (‘कॉरुगेटेड शीट्स’ची) आवश्यकता आहे…