चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे झालेल्या ढगफुटीत नद्यांना पूर येऊन १ सहस्राहून अधिक जनावरे वाहून गेली !

तालुक्यातील ४२ गावे बाधित झाली आहेत. नदीकाठच्या गावांतील १ सहस्राहून अधिक जनावरे वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कापूस, केळी, मका, हिरवा चारा आदी पिके उद्ध्वस्त झाली. शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने जमीन पडीक होण्याचा मोठा धोका आहे.

हिंदी महासागरातील तापमानवाढीमुळे भारतात पूरस्थिती निर्माण होणार ! – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

संयुक्त राष्ट्रांच्या ‘इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेन्ज’चा (‘आय.पी.सी.सी.’चा) ६ वा अहवाल ‘क्लायमेट चेंज २०२१ – दी फिजिकल सायन्स बेसिस’ प्रसिद्ध करण्यात आला. त्यात भारताविषयी चेतावणी देतांना हिंदी महासागराच्या तापमानवाढीमुळे समुद्रपातळीत वाढ होऊन किनारपट्टीच्या सखल भागांमध्ये वारंवार तीव्र पूरपरिस्थिती उद्भवेल, असे म्हटले आहे.

चिपळूणचा महापूर आपत्काळाच्या दाहकतेची झलक !

पुरात अडकलेल्या आणि जिवावर बेतलेल्या कुणालाही प्रशिक्षित यंत्रणेकडून साहाय्य मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. याचा सरळ अर्थ असा आहे की, आपल्यालाच आपल्या जीवितरक्षणासाठी झगडावे लागणार असून त्यासाठी स्वतःचे मनोबल आणि आत्मबळ अन् ईश्वरावरील श्रद्धा, हेच एकमात्र साधन आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने ४५० गावांमध्ये भूस्खलन

पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक १०२ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण १ सहस्र १८९ हेक्टर भूमी भूस्खलनामुळे बाधित झाली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने जनजीवन विस्कळीत !

गुरु आणि शिष्य यांनी धर्मावर आलेले संकट परतवून धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदु धर्माची महानता जगात प्रस्थापित करणारे स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात रामकृष्ण परमहंस गुरु म्हणून आले आणि त्यांच्याकडून महान कार्य करवून घतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून समर्थ रामदासस्वामी यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

सत्तरी तालुक्यात पुरामुळे सर्वाधिक हानी : अनेक गावांचा शहरापासून संपर्क तुटला

अतीवृष्टीमुळे राज्यातील म्हादई, वाळवंटी, रगाडा, शापोरा आदी नद्यांचे पाणी सत्तरी आणि डिचोली तालुक्यांमधील शेती-बागायतींमध्ये शिरले आहे. सर्वाधिक हानी सत्तरी तालुक्यात झाली आहे. पैकुळ, सत्तरी आणि शेळ-मेळावली येथील पूल कोसळले आहेत. अडवई, सत्तरी आणि वाळपई पालिका क्षेत्रातील काही घरे कोसळली आहेत. वाळपई शहरातील पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने अन्य गावांशी संपर्क तुटला आहे.

जर्मनीमध्ये पुरामुळे ८१ जणांचा मृत्यू, तर १०० हून अधिक लोक बेपत्ता

जर्मनीमध्ये मुसळधार पावसामुळे आलेेल्या पुरामुळे ८१ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.

वर्ष २०३० मध्ये चंद्राच्या कक्षेत पालट होऊन पृथ्वीवर पूरस्थिती निर्माण होईल ! – नासा

जागतिक हवामान पालटामुळे पृथ्वीवरील वातावरणावर परिणाम होत आहे. अंटार्टिकामधील बर्फ वितळत आहे. त्यामुळे समुद्रकिनार्‍यालगत शहरांमधील पाण्याची पातळी वाढत आहे.

हवामान पालटामुळे होणारी हानी सुधारता येणार नाही ! – वैज्ञानिकांचा दावा

प्रा. मार्कस रेक्स यांनी सांगितले की, आर्क्टिकमधील महासागरातून उन्हाळ्यात बर्फ गायब होणे ही हवामान पालटाची मोठी हानी आहे. येत्या काही दशकांत, समुद्रातील तापलेल्या वातावरणामुळे बर्फ समुद्रातून गायब होईल.

परात्पर गुरु डॉक्टर साधकांची प्रत्येक क्षणी आणि मृत्यूनंतरही काळजी घेणारच असल्याने साधकांनो, भक्तीभाव वाढवा !

साधकांना ‘पुढे येणार्‍या आपत्काळामध्ये आपले आणि आपल्या कुटुंबियांचे रक्षण कसे होणार ?’, अशासारख्या अनेक गोष्टींची काळजी असते. त्या वेळी साधक हे विसरतात की, ज्या देवाने आपल्याला जन्माला घातले आहे, तोच आपले रक्षण करणार आहे. आपण केवळ भगवंताच्या अनुसंधानात राहून भक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.