उज्जैन येथील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला भेट देणार्‍या जिज्ञासूंचे अभिप्राय !

उज्जैन येथील सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला भेट देणार्‍या जिज्ञासूंचे अभिप्राय !

सिंहस्थ क्षेत्री सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास भेट देणार्‍या साधूसंतांनी काढलेले गौरवोद्गार !

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे चालू असलेल्या सिंहस्थपर्वात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मशिक्षण फलक आणि ग्रंथ यांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शन पाहिल्यानंतर साधूसंत, महंत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आदींनी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती, त्यांचे कार्य, सनातनची ग्रंथसंपदा, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी पुढील गौरवोद्गार काढले.

सनातनच्या साधकाने प्रबोधन केल्यामुळे गळ्यातील क्रॉस काढून श्रीकृष्णाचे पदक घालणारा उज्जैन येथील कु. विशाल मकवाना !

     उज्जैन – येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे लावण्यात आलेल्या धर्मशिक्षण विषयक प्रदर्शनात उज्जैन जिल्ह्याच्या भाखाड गावातील कु. विशाल मकवाना नावाचा युवक गळ्यात क्रॉस घालून आला होता. (हिंदूंना आपल्या देवतांचे महत्त्व माहीत नसल्याने अर्थात् धर्मशिक्षणाच्या अभावामुळेच हिंदु तरुण गळ्यात क्रॉस घालण्यासारख्या कृती करतात ! – संपादक) गळ्यात क्रॉस घातल्याचे लक्षात आल्यावर … Read more

दुसर्‍या अमृत स्नानात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने साधूसंतांचे स्वागत अन् यात्रा सुनियोजन !

उज्जैन – येथील दुसर्‍या वैश्‍विक अमृत स्नानाच्या निमित्ताने ९ मे या दिवशी ३० लाखांहून अधिक भाविकांनी आणि लाखो साधूसंतांनी क्षिप्रा नदीत पवित्र स्नान केले. या वेळी प्रचंड गर्दीचा ओघ असल्यामुळे पोलिसांना सर्वांना नियंत्रणात ठेवणे कठीण जात होते. या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने यात्रा सुनियोजन करण्यात आले.

सनातन सांगत असलेल्या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार होणे आवश्यक आहे ! – श्री. प्रदीप पांडे, भाजपा उपाध्यक्ष

हिंदु संस्कृतीनुसार कसे आचरण व्हायला पाहिजे आणि कसे नको त्याविषयी सनातन संस्था सांगत असलेले ज्ञान अमूल्य आहे. या ज्ञानाचा सर्वत्र प्रचार व्हायला पाहिजे.

सनातन करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे ! – ज्योतिषाचार्य साध्वी गीता मिश्रा, अध्यक्ष, जय माता दरबार, बरेली, उत्तरप्रदेश

सनातनच्या प्रदर्शनात येऊन मला आत्मिक आनंद झाला. माझे आणि सनातनचे कार्य एकच आहे.

धर्मशास्त्रात सांगितलेल्या कृतींना प्रायोगिक रूप देण्याचे सनातनचे कार्य कौतुकास्पद ! – आचार्य राघवकीर्ती

सध्या सर्वत्रच देवतांचे विडंबन चालू आहे. त्यात धर्मशास्त्र आणि धर्मजागृती करण्याचे सनातन संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे.

हिंदूंना स्वातंत्र्यापासून आजतागायत धर्मशिक्षण दिले गेले नाही, हे हिंदूंचे दुर्दैवच ! – प.पू. स्वामी परमानंद सरस्वती महाराज

हिंदूंना स्वातंत्र्यपासूनच धर्मशिक्षण द्यायला हवे होते; मात्र हे धर्मशिक्षण दिले गेले नाही, हे दुर्दैवी. धर्मशिक्षण नसल्याने आज हिंदु समाज आपापसांत भांडून धर्म आणि राष्ट्र यांची हानी करत आहे, असे प्रतिपादन धर्मजागरण समितीचे धार जिल्हा उपाध्यक्ष प.पू. स्वामी परमानंद सरस्वतीजी महाराज यांनी केले.

आद्य शंकराचार्यांनी केलेल्या धर्मजागृतीच्या कार्याप्रमाणे सनातनच्या चळवळीला प्रतिसाद लाभो ! – महंत श्रीरामेश्‍वरपुरीजी महाराज, श्री काशी अन्नपूर्णा अन्नक्षेत्र ट्रस्ट, वाराणसी

संतांच्या चरणस्पर्शाने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी लावलेले प्रदर्शन झाले चैतन्यमय ! उज्जैन, ३० एप्रिल (वार्ता.) – आद्य शंकराचार्यांच्या वेळेस धर्माला ग्लानी आली होती. धर्माच्या रक्षणार्थ तन, मन आणि धन अर्पण करणार्‍यांची आवश्यकता होती. त्या वेळेस त्यांनी घराघरात जागृती करून नागा साधूंची सेना सिद्ध केली होती. त्याप्रकारेच सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती … Read more

प्रदर्शनास अनंत श्री दण्डीस्वामी हेमेन्द्रानन्द सरस्वती महाराज आणि सिंहस्थ मेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. दिवाकर नातू यांची भेट !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी लावलेले प्रदर्शन ! धर्मजागृतीसाठी आवश्यक असलेल्या कार्याच्या माहितीचे प्रदर्शनात विश्‍लेषण ! – अनंत श्री दण्डीस्वामी हेमेन्द्रानन्द सरस्वती महाराज सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य साधू-संताचेच कार्य आहे. प्रत्येक हिंदूला धर्मविषयक कोणते कार्य करणे अपेक्षित आहे त्या सर्वांची माहिती या प्रदर्शनात आहे. हे विशेष महत्त्वाचे आहे. … Read more