साधकांनो, आध्यात्मिक त्रासांची तीव्रता वाढल्यामुळे आध्यात्मिक उपाय नियमित करण्यासह व्यष्टी साधनाही वाढवा !

आताचा आपत्काळ आपल्याला अतिशय कठीण वाटतो; पण हा काळ संधीकाळही आहे. ‘या काळात साधनेचे थोडे जरी प्रयत्न केले, तरी त्याचे फळ अधिक प्रमाणात मिळते’, हे या संधीकाळाचे महत्त्व आहे.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे गोरक्षपीठ पीठाधीश्वर आणि उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण !

सनातन संस्थेचे चांगले कार्य चालू आहे. या कार्याबद्दल तुमचे अभिनंदन ! अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक हिंदूंना संघटित करा, असा आशीर्वाद उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांनी सनातन संस्थेला दिला.

न्याय्य जीवनाचे सार जगासमोर प्रदर्शित करणारा ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ यशस्वी होईल ! – हिंदुत्वनिष्ठ नेते के. अन्नमलाई, तमिळनाडू

१७ मे ते १९ मे २०२५ या कालावधीत गोव्यात होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण दिल्यानंतर त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना पत्र लिहून त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार देऊन सन्मानित करणार !

केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस ट्रस्ट’च्या वतीने देण्यात येणारा ‘ॐ शिव शक्ति ॐ पुरस्कार’ यावर्षी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना घोषित करण्यात आला आहे.

भारतभरात विविध मान्यवरांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण !

महोत्सवाच्या स्वागत समितीचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी देहली येथे संरक्षण राज्यमंत्री श्री. संजय सेठ यांना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण दिले. त्यांनी महोत्सवाला उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले.

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ग्राहकांना भेट म्हणून सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ देण्यासाठी सराफी दुकानदारांना उद्युक्त करा !

सनातनची अनमोल ग्रंथसंपदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने साधकांनी सर्वत्रच्या सराफी दुकानदारांना संपर्क करावा.

Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav : सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात आली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट !

गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेण्यात आली.

सनातनच्‍या सात्त्विक मूर्ती सिद्ध करण्‍याच्‍या सेवेत योगदान द्या !

जे साधक, हितचिंतक, वाचक आदींना मूर्तीकलेविषयी ज्ञान आहे किंवा ज्‍यांची हे सर्व साधना म्‍हणून शिकण्‍याची अन् सेवा करण्‍याची इच्‍छा आहे, अशांनी त्‍यांची नावे जिल्‍हासेवकांच्‍या माध्‍यमातून कळवावी.

गायत्री परिवाराच्या ‘ज्योती कलश यात्रे’चे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भावपूर्ण आगमन !

अखिल विश्व गायत्री परिवाराचे मुख्यालय असलेल्या हरिद्वार येथील शांतीकुंज येथून अभिमंत्रित केलेला कलश घेऊन आलेल्या गायत्री परिवाराच्या ‘ज्योती कलश यात्रे’चे २० एप्रिल या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले.

पुणे येथे मंदिर विश्वस्त, खासदार, नगरसेवक, देहू संस्थांनचे अध्यक्ष आदींना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण !

आमदार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज देहूकर म्हणाले की, सनातन संस्थेचे कार्य पुष्कळ मोठे आहे. आजच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांसाठी आध्यात्मिक स्तरावर कार्य करणे पुष्कळ मोठी गोष्ट आहे.