नवी मुंबई येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

कामोठे येथील ‘६ व्या मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन’मध्ये ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत आयोजित केलेल्या सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि जिज्ञासू यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

सनातनच्या वतीने हावडा (बंगाल) येथे दत्त जयंतीनिमित्त आयोजित प्रवचनाला चांगला प्रतिसाद !

दत्त जयंतीनिमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथील आनंदमयी आश्रम मंदिरामध्ये एका प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या साधिका सौ. तनुश्री साहा यांनी दत्तजयंतीचे महत्त्व, दत्त नावाची वैशिष्ट्ये, भगवान दत्तात्रयाच्या जन्माचे रहस्य, दत्त उपासनेचे शास्त्र आदी सूत्रांविषयी माहिती दिली.

आनंदी जीवनासाठी व्यक्तीमत्त्वातील दोष शोधून दूर करणे आवश्यक ! – कु. कृतिका खत्री, सनातन संस्था

सनातन संस्थेच्या वतीने येथील नूतन मराठी सीनियर सेकेंडरी स्कूलमध्ये शिक्षिकांसाठी ‘तणावमुक्त जीवन कसे जगावे ?’, या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.

मेक्सिको येथील ‘ग्वादालाहारा इंटरनॅशनल बुक फेअर’मध्ये सनातनचे ग्रंथ प्रदर्शित !

ग्ग्वादालाहारा (मेक्सिको) येथे वर्ष २०२१ मध्ये भरवण्यात आलेल्या ‘ग्वादालाहारा इंटरनॅशनल बुक फेअर’मध्ये (ग्वादालाहारा आंतराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात) सनातनचे ग्रंथ प्रदर्शित करण्यात आले होते. भारत शासनाच्या ‘राष्ट्रीय पुस्तक न्यासा’च्या वतीने हे ग्रंथ या आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यासाठी पाठवण्यात आले होते.

मुलुंड (मुंबई) येथील कोकण महोत्सवात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंसह विविध मान्यवरांची भेट !

मुलुंड (पूर्व) येथील तालुका क्रीडासंकुल येथे मुलुंड सेवा संघ महिला बचतगट आणि भाजप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

फरीदाबाद (हरियाणा) येथील गीता महोत्सवामध्ये सनातन संस्थेचा सहभाग !

फरीदाबाद येथे जिल्हास्तरीय गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, सात्त्विक उत्पादने, तसेच धर्मशिक्षण देणारे प्रदर्शन लावण्यात आले होते.

दत्त जयंती २०२२ निमित्त सनातन संस्थेचे ठिकठिकाणी ग्रंथ-उत्पादन प्रदर्शन !

दत्त जयंती २०२२ निमित्त सनातन संस्थेने ठिकठिकाणी ग्रंथ-उत्पादन प्रदर्शन लावले होते. या प्रदर्शनांना मान्यवर आणि जिझासू यांनी भेट देऊन चांगला प्रतिसाद दिला.

श्री क्षेत्र माणगाव (सिंधुदुर्ग) येथील दत्तमंदिरात वर्ष २०२१ च्या दत्तजयंतीपूर्वी सद्गुरु सत्यवान कदम यांच्या हस्ते झालेले सनातनच्या प्रदर्शन कक्षांचे उद्घाटन !

व्यष्टी साधना चांगली झाल्यावर समष्टी सेवाही चांगली होते आणि आनंद मिळतो. गुरूंचे मन जिंकण्याची गोष्ट म्हणजे सेवा ! प्रत्येक सेवा परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांजवळ जाण्यासाठीच असून सेवा परिपूर्ण केल्यास ती ईश्वरचरणी रुजू होते. त्यामुळे साधकांनी परिपूर्ण सेवा होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

भोर येथील ‘सुभाष इंजिनीयरिंग वर्क्स’ या आस्थापनात ‘आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन

सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आनंद शोधत असतो, तो मिळवून आनंदी जीवन जगायचे असेल, तर प्रत्येकाने साधना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. शशांक मुळे यांनी केले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. मुलुंड (पूर्व) येथील तालुका क्रीडासंकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने हे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे.