महाशिवरात्री निमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ५० हून अधिक ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन !

महाशिवरात्री निमित्त पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने, ग्रंथप्रदर्शन, फ्लेक्स प्रदर्शन, फलक लेखन, प्रत्यक्ष आणि ऑनलाईन व्याख्याने आदी माध्यमांतून व्यापक स्तरावर धर्म आणि अध्यात्म प्रसार करण्यात आला.

‘पंचमहाभूत लोकोत्सवा’त सनातन संस्थेचा कक्ष !

या महोत्सवात सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचा कक्ष ‘डी-७०’ येथे लावण्यात आला आहे. हा कक्ष सकाळी ९ ते रात्री ८.३० या वेळेत जिज्ञासूंना पहाण्यासाठी खुला असणार आहे.

महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रात सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे ४०० हून अधिक प्रदर्शन कक्ष !

सनातनच्या या ग्रंथप्रदर्शनाला विविध पक्षांचे राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी यांनी भेटी दिल्या. अनेक ठिकाणी पहार्‍यासाठी असलेल्या पोलीस अधिकार्‍यांनीही ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने घेतली.

महाशिवरात्री निमित्त सनातन संस्थेच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शन स्थळी मान्यवरांच्या भेटी !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे (उजवीकडे) यांनी पेण येथील प्रदर्शनकक्षाला भेट दिली. या वेळी त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘नटराज वंदना’ विशेषांक भेट देण्यात आला.

पुणे येथे सनातन संस्थेकडून श्री गजानन महाराज प्रकटदिन निमित्त ग्रंथ प्रदर्शन !

श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त १३ फेब्रुवारी या दिवशी पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महाशिवरात्री निमित्त पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादन यांचे प्रदर्शन !

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेने जिल्ह्यात अनेक शिवमंदिरांमध्ये ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनांचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

वारुंजी (जिल्हा सातारा) येथे सनातन संस्थेचे ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. कांतावती देशमुख यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर उपस्थित महिलांना कुलदेवतेच्या उपासनेचे, तसेच श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणाचे महत्त्व, दैनंदिन जीवनात आनंद कसा शोधायचा ? यावर विस्तृतपणे मार्गदर्शन केले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात कन्‍नड भाषेतील साधना शिबिर पार पडले !

या शिबिरात ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या कार्याचा परिचय’ हा विषय श्री. मोहन गौडा आणि श्री. शरद कुमार यांनी मांडला. ‘आनंदी जीवनासाठी अध्‍यात्‍म’ हा विषय सौ. मंजुळा गौडा आणि श्री. अरुण कुलकर्णी यांनी, तर ‘गुरुकृपायोगानुसार साधनेचे महत्त्व’ हा विषय सौ. मंजुळा गौडा अन् कु. रेवती मोगेर यांनी मांडला.

‘हैद्राबाद बुक फेअर’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे प्रतिवर्षीप्रमाणे २२ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ या कालावधीत ३५ वे ‘हैद्राबाद बुक फेअर’चे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी लावण्यात आलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भोसरी (जिल्हा पुणे) येथील ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषद महोत्सवाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सनातनच्या ग्रंथ-उत्पादन प्रदर्शनास जिज्ञासूंच्या भेटी !

भोसरी (पुणे) येथील ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषदे’च्या द्वितीय दिवशी महोत्सवाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या सनातनच्या  ग्रंथ-उत्पादन प्रदर्शनास जिज्ञासूंनी भेटी दिल्या.