दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेशमध्ये अध्यात्मप्रसार

दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेश मध्ये अध्यात्मप्रसार ! इंदूर, उज्जैन आणि बांगर (देवास) येथे फ्लेक्स अन् ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले. इंदूर येथे ग्रंथ प्रदर्शनाला ३ सहस्र जिज्ञासूंनी भेट दिली. ‘श्री दत्ताचे कार्य सनातन संस्था करत आहे !’ असे पू. गजानन गुरुनाथ कुलकर्णी (उपाख्य छोटे काका महाराज) यांनी गौरवोद्गार काढून आशीर्वाद दिले.

सनातन संस्थेच्या वतीने राजस्थानमध्ये झालेले अध्यात्मप्रसाराचे कार्य

राजस्थान येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन, धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन, शाळेतील मातृसंमेलन आणि पितृपक्षानिमित्त प्रवचन, इत्यादी उपक्रमांचा आढावा.

सनातन संस्थेची वैशिष्ट्ये

सनातन संस्थेची स्थानपा राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करण्यासाठी झाली. प्रत्यक्ष जीवनात ‘अध्यात्म’ जगायला शिकवणारी सनातन संस्था !

अध्यात्मप्रसार

समाजाची सात्त्विकता वाढविण्यासाठी हजारो साधक आज संस्थेच्या मार्गदर्शनाखाली तन, मन, धन यांचा त्याग करून समाजामध्ये अध्यात्मशास्त्राचा प्रसार करत आहेत.