रेंदाळ (जिल्हा कोल्हापूर) येथे गणेशपूजनाविषयीच्या अध्यात्मशास्त्र या विषयावरील प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती प्रतिष्ठापनाच्या निमित्ताने येथील श्री ॐ सेवाभावी संस्था यांच्या मंडळात २५ ऑगस्टला सामूहिक गणेशाचा नामजप आणि ‘गणेश पूजनाविषयीचे अध्यात्मशास्त्र’ या विषयावर प्रवचन पार पडले.

जळगाव पिपल्स बँकेत ‘श्री गणेशपूजेतील अध्यात्मशास्त्र’ विषयावर प्रवचन

जळगाव शहरातील प्रख्यात जळगाव पिपल्स बँकेत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘श्री गणेशपूजेतील अध्यात्मशास्त्र’ आणि ‘भारतीय सण-उत्सवामांगील विज्ञान’ या विषयांवर व्याख्यान घेण्यात आले.

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेने जीवन आनंदी बनेल – शिक्षकांचा अभिप्राय

जळगाव येथील शिक्षकांसाठी सनातन संस्थेच्या वतीने २६ ऑगस्टला ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया कशी राबवावी ?’ याविषयी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत ४५ शिक्षकांनी सहभाग घेतला.

चोपडा (जळगाव) येथे पंकज विद्यालय येथील शिक्षकवृंदासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन या विषयावर कार्यशाळा

चोपडा येथील पंकज विद्यालयात शिक्षकांसाठी सनातन संस्थेच्या वतीने २६ ऑगस्टला स्वभावदोष आणि अहं निमूर्लन प्रक्रिया कशी राबवावी ? याविषयी कार्यशाळा घेण्यात आली.

चेन्नई येथील आदिपराशक्ती मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन

तमिळनाडूच्या चेन्नईमधील अरुंबक्कम् येथील आदिपराशक्ती मंदिरात वरलक्ष्मी व्रताच्या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. सनातनच्या साधिका श्रीमती कृष्णवेणी आणि श्रीमती गीता लक्ष्मी यांनी ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेत सहभाग घेतला.

गडचिरोली येथे सनातन संस्थेच्या वतीने स्वभावदोष आणि अहं निर्मूलन शिबिराचे आयोजन

श्री गुरुमंदिर नागपूरप्रणित प.पू. श्री विष्णूदास महाराज अध्यात्म साधना केंद्रातील साधकांसाठी ४ ऑगस्टला स्वभावदोष आणि अहं निर्मूलन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सौ. मंदाकिनी डगवार यांनी सनातन संस्थेच्या वतीने उपस्थितांना मार्गदर्शन केले.

देहली येथे दत्त जयंती निमित्त ग्रंथप्रदर्शन

दत्त जयंती निमित्त सनातन संस्थेच्या वतीने येथील जनकपुरीच्या दत्तविनायक मंदिरात ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील ग्रंथांचा समावेश होता. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.

दत्त जयंती निमित्त ठाणे जिल्ह्यात लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि मान्यवर यांच्या भेटी

ठाणे येथे दत्त जयंती निमित्त ३३ ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. त्यांपैकी काही ठिकाणच्या प्रदर्शनांना विविध मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांनी भेटी दिल्या.

दत्त जयंती निमित्त बांगर येथील श्री दत्त पादुका मंदिरात सनातन संस्थेने लावलेल्या ग्रंथ-उत्पादन प्रदर्शनाचा सहस्रो जिज्ञासूंनी घेतला लाभ !

दत्त जयंती निमित्त बांगर येथील श्री दत्त पादुका मंदिरात जन्मोत्सव साजरा केला गेला. या ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ‘देवालय दर्शन’, ‘साधना’, ‘धर्माचरण’, यांविषयी मार्गदर्शन करणार्‍या फ्लेक्स फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले. तसेच सनातनच्या विविध विषयांवरील अनमोल ग्रंथ आणि सात्त्विक पूजासाहित्य यांचा वितरण कक्षही उभारण्यात आला.

दत्त जयंती निमित्त नवी मुंबई, मुंबई, पालघर येथे सनातनने उभारलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचा सहस्रावधी जिज्ञासूंनी लाभ घेतला

दत्त जयंती निमित्त १३ डिसेंबर या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने मुंबई, नवी मुंबई येथे ५० ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनाला सहस्रावधी जिज्ञासूंनी भेट देऊन सनातनचे ग्रंथ खरेदी केले. येथील ग्रंथकक्षावर शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी यांनी भेट दिली.