पंढरपूर येथे शिवरात्रीनिमित्त सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास उत्तम प्रतिसाद

पंढरपूर येथील श्री संत तनपुरे महाराज मठात महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला अनेक भाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

सोलापूर येथे महाराष्ट्र राज्यातील ग्रंथपालांच्या राज्यअधिवेशनात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर येथे १७ फेब्रुवारी या दिवशी हुतात्मा स्मृती मंदिर येथे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ग्रंथपालांचे एकदिवसीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून मनापासून साधना करणे आवश्यक ! – रमानंद गौडा, सनातन संस्था

सध्या आपण स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया मनापासून आणि गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून राबवणे क्रमप्राप्त आहे. अंतःकरण शुद्धी झाली, तरच आपण भगवंताच्या समीप जाऊ शकतो. त्यासाठी आपण सर्वांनी अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत.

महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रात विविध ठिकाणी लावलेले सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाला मान्यवरांच्या भेटी अन् ग्रंथांचे कौतुक

कल्याण येथील श्री शंकर मंदिरात लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला येथील भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार यांनी भेट दिली. त्यांनी सनातनच्या ग्रंथांची माहिती जाणून घेत ग्रंथ खरेदीही केली.

सनातन संस्थेकडून महाशिवरात्रीनिमित्त देशभर ६५० हून अधिक ठिकाणी धर्मप्रसार

सनातन संस्थेच्या वतीने देशभरातील विविध शिवमंदिरांमध्ये ६५० हून अधिक ठिकाणी ग्रंथ आणि सात्त्विक साहित्यांचे वितरण कक्ष, तसेच शिवाची अध्यात्मशास्त्रीय माहिती सांगणारे फलक लावून धर्मप्रसार करण्यात आला.

नागपूर येथे धर्मरथावरील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

४ फेब्रुवारीला रुद्रशक्ति एनक्लेव्ह, मनिषनगर, नागपूर येथे सनातनच्या धर्मरथाच्या (सात्त्विक उत्पादने आणि सनातनचे ग्रंथ यांचे फिरते वितरणकेंद्र) माध्यमातून राष्ट्ररक्षण, धर्मजागृतीविषयक, तसेच अध्यात्मशास्त्र सुलभ भाषेत सांगणारे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले.

‘हैद्राबाद बूक फेअर’ मधील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला सहस्रो ग्रंथप्रेमींची भेट

भाग्यनगर (हैद्राबाद) येथे १८ ते २८ जानेवारी या कालावधीत पार पडलेल्या ‘हैद्राबाद बूक फेअर’मध्ये सनातनच्या ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. या ग्रंथप्रदर्शनात राष्ट्र, धर्म, आयुर्वेद आदी विविध विषयांवरील तेलुगु, हिंदी आणि इंग्रजी या भाषांतील सनातनच्या ग्रंथांचा समावेश होता.

बारामती येथे सनातन संस्थेच्या वतीने मकरसंक्रातीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रम

बारामती (जिल्हा पुणे) येथे मकरसंक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संक्रांत या सणाविषयी माहिती देणारे चलचित्र (व्हिडिओ) महिलांना दाखवण्यात आले.

सनातनच्या धर्मरथाच्या माध्यमातून अमरावती येथे अध्यात्मप्रसार

अमरावती शहर, मोर्शी आणि मूर्तीजापूर गावांमध्ये सनातनच्या धर्मरथाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला. मूर्तीजापूर गावात ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष चंदन अग्रवाल, भाजप शहराध्यक्ष भारत भगत, तसेच स्थानिक ज्येष्ठ समाजसेवक कमलाकर गावंडे यांनी धर्मरथाचे पूजन करून प्रसारकार्याला प्रारंभ केला.

वडनेरभैरव (नाशिक) येथे मकरसंक्रांतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी प्रवचन

वडनेरभैरव (नाशिक) येथे एकता ग्रुपच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. वसुधा चौधरी यांनी मकरसंक्रांतीचे महत्त्व आणि लाभ तसेच धर्मशिक्षणाचे महत्त्व या विषयावर प्रवचन घेतले.