सनातन संस्थेच्या आध्यात्मिक क्षेत्रातील विशेष कार्याचा हिंदुत्वनिष्ठांना परिचय

६ जून या दिवशी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सनातन संस्थेच्या आध्यात्मिक क्षेत्रातील कार्याविषयी एक विशेष सत्र झाले.

सोलापूर येथील नगरसेवक श्री. विक्रांत (मुन्ना) वानकर यांच्या हस्ते पूजन करून सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाला प्रारंभ

सनातन संस्थेच्या वतीने धर्मरथाच्या माध्यमातून सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन सोलापूर येथील दत्त चौक, दत्त मंदिराच्या जवळ लावण्यात आले आहे. येथील भाजपचे नगरसेवक श्री. विक्रांत (मुन्ना) वानकर यांच्या हस्ते पूजन करून प्रदर्शनाला प्रारंभ करण्यात आला.

पुणे जिल्ह्यात सनातन संस्थेच्या धर्मरथ प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद !

सनातन संस्थेच्या वतीने धर्मरथाच्या माध्यमातून सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन सहकारनगर, सदाशिव पेठ, शनिवार पेठ, कोथरूड, हडपसर, सिंहगड रस्ता, विश्रांतवाडी, शिरवळ (जिल्हा सातारा) येथे लावण्यात आले. त्याला जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

एर्नाकुलम् (केरळ) जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद !

‘१ ते ११.३.२०१८ या कालावधीत एर्नाकुलम् जिल्ह्यातील मरिन ड्राइव्ह येथे आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा (इंटरनॅशनल बुक फेअर) आयोजित केला होता. सनातन संस्थेच्या वतीने लावलेल्या ग्रंथप्रदर्शनात अध्यात्म, देवतांची उपासना, पालकांसाठी, तसेच बालसंस्कार आदी विषयांवरील ग्रंथ होते. याला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

भादरा (राजस्थान) येथे सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भादरा (राजस्थान) येथील प्रबलजी महाराज यांच्या आश्रमामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातनच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

पंढरपूर येथे शिवरात्रीनिमित्त सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास उत्तम प्रतिसाद

पंढरपूर येथील श्री संत तनपुरे महाराज मठात महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला अनेक भाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

सोलापूर येथे महाराष्ट्र राज्यातील ग्रंथपालांच्या राज्यअधिवेशनात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर येथे १७ फेब्रुवारी या दिवशी हुतात्मा स्मृती मंदिर येथे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ग्रंथपालांचे एकदिवसीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून मनापासून साधना करणे आवश्यक ! – रमानंद गौडा, सनातन संस्था

सध्या आपण स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया मनापासून आणि गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून राबवणे क्रमप्राप्त आहे. अंतःकरण शुद्धी झाली, तरच आपण भगवंताच्या समीप जाऊ शकतो. त्यासाठी आपण सर्वांनी अधिकाधिक प्रयत्न केले पाहिजेत.

महाशिवरात्रीनिमित्त महाराष्ट्रात विविध ठिकाणी लावलेले सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाला मान्यवरांच्या भेटी अन् ग्रंथांचे कौतुक

कल्याण येथील श्री शंकर मंदिरात लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाला येथील भाजपचे आमदार श्री. नरेंद्र पवार यांनी भेट दिली. त्यांनी सनातनच्या ग्रंथांची माहिती जाणून घेत ग्रंथ खरेदीही केली.

सनातन संस्थेकडून महाशिवरात्रीनिमित्त देशभर ६५० हून अधिक ठिकाणी धर्मप्रसार

सनातन संस्थेच्या वतीने देशभरातील विविध शिवमंदिरांमध्ये ६५० हून अधिक ठिकाणी ग्रंथ आणि सात्त्विक साहित्यांचे वितरण कक्ष, तसेच शिवाची अध्यात्मशास्त्रीय माहिती सांगणारे फलक लावून धर्मप्रसार करण्यात आला.