देहली येथील ‘जागतिक पुस्तक मेळाव्या’त सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला मान्यवरांची भेट

येथील प्रगती मैदानावर १० ते १८ फेब्रुवारी या कालावधीत ‘जागतिक पुस्तक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ग्रंथांचे प्रदर्शन दोन वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले.

इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘तरुण जत्रा’ मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्मप्रसार

प्रतिवर्षीप्रमाणे चालू वर्षीही येथील दशहरा मैदानावर ‘तरुण जत्रा’ या मराठी पदार्थ आणि संस्कृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने धर्म, अध्यात्म, बालसंस्कार आदी विविध विषयांवरील ग्रंथ आणि सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

सनातन संस्थेद्वारा हरमल, गोवा येथे आयोजित ‘जाहीर साधना प्रवचन’ संपन्न !

सनातन संस्थेद्वारे हरमल गोवा येथे आनंदी जीवनासाठी अध्यात्म  या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. सौ. शुभ सावंत व सौ. अंजली नायक यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. ह्यावेळी ४० हून अधिक जिज्ञासू व्याख्यानाला उपस्थित होते.

श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त सनातन संस्थेकडून देशभरात चालवण्यात येत असलेले ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ !

सातारा, वाई, संभाजीनगर, कोरेगाव येथे सनातन संस्थेकडून ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ !

श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त सनातन संस्थेकडून ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’ !

सनातन संस्थेकडून देशभरात ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियाना’द्वारे ठिकठिकाणी श्रीरामनाम जप, श्रीरामाकडे रामराज्यासाठी प्रार्थना, तसेच श्रीरामांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.

गोवा राज्यात सनातन संस्थेचे जाहीर साधना प्रवचन

सनातन संस्थे द्वारा आनंदी जीवनासाठी साधना या विषयावर जाहीर साधना प्रवचनाचे गोव्यात म्हपसा (6.01.2024) आणि वाळपई (7.01.2024) येथे आयोजन !

कोचि (केरळ) येथे सनातन संस्थेच्या वतीने दत्त जयंती निमित्त प्रवचन पार पडले !

कोचि (केरळ) – येथील दत्त मंदिरात २६ डिसेंबर या दत्त जयंतीच्या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन घेण्यात आले. याचा लाभ अनेक जिज्ञासू आणि दत्तभक्त यांनी घेतला.

दत्त जयंती २०२३ निमित्त पुणे येथे सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादन आणि ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे येथे विविध ठिकाणी लावलेल्या सनातन संस्थेच्या सात्त्विक उत्पादन आणि ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद तसेच विविध प्रतिष्ठितांची भेट !

फरिदाबाद (हरियाणा) येथे ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवा’त सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘गीता जयंती’निमित्त २२ आणि २३ डिसेंबर या दिवशी फरिदाबादमध्ये ‘आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव’ साजरा करण्यात आला.