महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रंथप्रदर्शन !

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. याला भाविकांसह मान्यवरांनीही भेट दिली.

ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण देणारे फलक यांचे प्रदर्शन

ब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येेथील खंडवा रोडवरील श्री गणपति मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने नुकतेच ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण देणारे फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

मोक्षप्राप्ती करण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

 धर्माने सांगितलेल्या चार पुरुषार्थांपैकी ‘मोक्ष’ या पुरुषार्थाची प्राप्ती करण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी येथे केले.

अक्कलकोट : महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या ५५ व्या अधिवेशनात सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन

या अधिवेशनामध्ये सनातनचे ग्रंथप्रदर्शनही लावण्यात आले आहे. महाराष्ट्रातील वाचनालयांचे प्रतिनिधी येथे असणार्‍या विविध ग्रंथ प्रदर्शनांना भेटी देतात आणि त्याप्रमाणे वाचनालयासाठी लागणार्‍या ग्रंथांची खरेदीही करतात.

वर्धा जिल्ह्यात सनातनच्या धर्मरथ प्रदर्शनाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद

सनातन संस्थेच्या वतीने जानेवारी २०१९ मध्ये वर्धा जिल्ह्यात विविध ठिकाणी सनातनच्या धर्मरथातील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. पुलगाव, हिंंगणघाट, सेलू, सिंदी, आर्वी आणि देवळी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जोधपूर येथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

जोधपूरच्या पोलो मैदानावर नुकतेच आंतरराष्ट्रीय माहेश्वरी महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि धर्मशिक्षणफलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

कुंभमेळ्यात सनातन संस्थेच्या वतीने ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे कुंभमेळ्याचे शास्त्र सांगून अध्यात्मप्रसार

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने प्रयागराज येथे पहिल्या राजयोगी स्नानाच्या वेळी कुंभमेळ्याचे महत्त्व आणि शास्त्र फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून समिती अन् संस्थेच्या दर्शकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला.

जबलपूर येथे आयोजित ‘मकर संक्रमण व्याख्यानमाले’त सनातन संस्थेच्या वतीने सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन

सध्या मनुष्य सुख मिळवण्यासाठी धडपडत आहे; मात्र भौतिकतावादी जगात सर्वोच्च आनंदाची प्राप्ती होऊ शकत नाही. त्यासाठी साधना करावी लागते.

विजयपूर येथील भारतीय संस्कृती उत्सवात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार

विजयपूर येथील ज्ञानयोगाश्रमाचे पू. श्री सिद्धेश्वर स्वामी यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली.

भाग्यनगर येथील ‘हैद्राबाद बूक फेअर’मध्ये लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याला प्रतिदिन सहस्रो जिज्ञासूंनी भेट दिली. या ठिकाणी एकूण ३५० प्रदर्शनांचे कक्ष लावण्यात आले होते. यात सनातनचे प्रदर्शन जिज्ञासूंसाठी प्रमुख आकर्षण ठरले.