आनंदमय जीवनासाठी दोषनिर्मूलन आणि गुणसंवर्धन करणे आवश्यक ! – सौ. मधुलिका गोयल, सनातन संस्था

आपण कोणत्याही परिस्थितीकडे कसे पहातो ?, हे आपले गुण आणि दोष यांवर अवलंबून आहे. त्यामुळे दोषनिर्मूलनासह गुणसंवर्धन करण्याचा प्रयत्न केल्यास आपण निश्चितपणे आनंदमय जीवन जगू शकतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. मधुलिका गोयल यांनी केले.

कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !

कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने २३ एप्रिल या दिवशी प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. प्रवचन झाल्यावर उपस्थित जिज्ञासूंनी दत्ताच्या नामजपाविषयी सविस्तर जाणून घेतले.

ठाणे जिल्ह्यात हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने व्यापक धर्मप्रसार !

हनुमान जयंतीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील विविध मंदिरांच्या परिसरात २२ ठिकाणी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ याचे प्रदर्शन अन वितरण केंद्रे उभारण्यात आली होती.

रामनवमी निमित्त पुणे जिल्ह्यातील प्रवचन, नामजप ग्रंथप्रदर्शन कक्ष यांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद !

या वेळी श्रीरामनवमीचे महत्त्व सांगून आणि श्रीरामनामाचा जप करून श्रीरामाची कृपा संपादन करण्याविषयी उपस्थितांना सांगण्यात आले. पुणे जिल्ह्यात सत्संगातील जिज्ञासूंनी प्रभु श्रीरामचंद्राची कृपा संपादन करण्यासाठी फलकप्रसिद्धीची सेवा तळमळीने केली.

श्रीरामनवमी निमित्त कोल्हापूर जिल्ह्यात २० ठिकाणी सनातन संस्थेचे सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथप्रदर्शन !

निपाणी (कर्नाटक) येथील प्रदर्शन कक्षास भाजपच्या आमदार सौ. शशिकला जोल्ले यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भेट देऊन सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ खरेदी केले.

पाळधी (जिल्हा जळगाव) येथे ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान !

सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस हे जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत.

मुंबई, ठाणे, रायगड येथे सहस्रावधी जिज्ञासूंनी दिली सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांत महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराच्या मंदिराच्या परिसरात सनातन संस्थेच्या वतीने १३६ ठिकाणी ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती. त्यांना सहस्रावधी जिज्ञासूंनी भेट देऊन सनातनचे विविधांगी ग्रंथ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने खरेदी केली.

राजीम कुंभमेळा (छत्तीसगड) येथे सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे पू. राम बालकदास महात्यागी यांच्या हस्ते उद्घाटन !

सनातन संस्थेच्या वतीने येथील राजीम कुंभमेळ्यामध्ये धर्म आणि अध्यात्म या विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले, तसेच धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

कुलदेवतेचे नामस्मरण केल्याने कलियुगात कल्याण होईल ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

ज्या कुळात आपला जन्म झाला आहे, त्या कुलदेवतेचे नामस्मरण करा. ती आपल्या प्रारब्धाशी संबंधित देवता आहे. आपली साधना वाढल्यावर आपल्याला जीवनात सद्गुरु भेटतील. नामस्मरण केल्यास जीवनाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले.

मुझफ्फरपूर (बिहार) येथे शिवजयंतीच्या उत्सवात सनातन संस्थेचा सहभाग

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘विश्व सनातन सेने’चे तिरहुत विभागाचे श्री. अनिल कुमार यांनी शिवजयंती उत्सव आयोजित केला होता. या उत्सवामध्ये सनातन संस्थेच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.