तुमच्या कार्यामुळे सनातन धर्म बळकट होत आहे ! – आमदार आणि महामंडलेश्वर रविदासाचार्य श्री. सुरेश राठौर, हरिद्वार
या नगरीत तुम्ही लावलेले केंद्र धर्माविषयी ज्ञानाचे स्रोत आहे. हिंदु संस्कृती विज्ञानावर आधारित आहे. तुमच्या कार्यामुळे सनातन धर्माला बळकटी मिळत आहे. तुम्ही विज्ञानाच्या आधारावर धर्म प्रमाणित करण्याचा प्रयत्न करत आहात. त्याविषयी तुम्हाला धन्यवाद देतो, असे कौतुकोद्गार येथील ज्वालापूर विधानसभेचे भाजप आमदार आणि महामंडलेश्वर रविदासाचार्य श्री. सुरेश राठौर यांनी केले.