सनातन संस्थेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त ‘श्री गणेशाची अध्यात्मशास्त्रीय माहिती ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून दाखवणे आणि श्री गणेशाचा नामजप करणे’, या ऑनलाईन सोहळ्याचे आयोजन
कोणताही सण शास्त्र जाणून साजरा केल्यास त्याचा अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोनातून अधिक लाभ अनुभवता येतो. सनातन संस्था प्रत्येक सणाचे शास्त्र सांगून सण साजरे करायला सांगते. गणेशोत्सवाच्या काळात श्री गणेशाच्या नामजपाचा लाभ घ्या, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी केले.