मुलुंड (मुंबई) येथे ‘साधना सत्संग शिबिर’ भावपूर्ण वातावरणात पार पडले !
सद्गुरु आणि संत यांच्या वंदनीय उपस्थितीत मुलुंड येथे २९ मार्च या दिवशी ‘साधना सत्संग शिबिर’ भावपूर्ण वातावरणात पार पडले. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील जिज्ञासूंसाठी सनातन संस्थेच्या वतीने मुलुंड येथील ‘मुलुंड सेवा संघा’च्या सभागृहात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.