श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या वर्षपूर्तीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने हरियाणामध्ये कार्यक्रमांचे आयोजन
अयोध्येत श्री रामलल्लाच्या (श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने हरियाणातील फरिदाबाद आणि धारुहेरा (रेवाडी) येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सनातन संस्थेच्या सरोज गुप्ता आणि सौ. स्वाती सातपुते यांनी कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश सांगितला.