सरकारने चीनची आर्थिक नाकेबंदी करावी : यवतमाळ येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

कैलास मानसरोवर यात्रेसाठी जाणार्‍या भारतियांना नाथुला खिंडीतून जाण्यास चीनने प्रतिबंध घातला, तसेच सिक्किमच्या डोकलाम भागात सीमारेषा पार करून दोन भारतीय बंकर उद्ध्वस्त केली. असे असूनही सरकार चीनशी व्यापार वाढवत आहे.

चिनी ‘ड्रॅगन’ला रोखण्यासाठी चिनी वस्तू आणि राख्या यांवर बहिष्कार घाला ! – आंदोलनाद्वारे एकमुखी मागणी

कुरापतखोर अरुणाचल प्रदेश आणि लडाख येथे सीमावाद चालू ठेवण्यासमवेत आता सिक्कीममध्येही घुसखोरी करत डोकलाम हा चीनचा भूभाग असल्याचे चीन सांगत आहे. असे असतांनाही भारत चीनशी व्यापार वाढवत आहे आणि चिनी ‘ड्रॅगन’ भारताच्या घराघरांत पोहोचवत आहे.

जय जवान गणेशोत्सव मंडळात धर्मशिक्षण आणि क्रांतीकारकांची माहिती देणारे फ्लेक्सप्रदर्शन !

६ ते ९ सप्टेंबर या कालावधीत लावलेल्या या प्रदर्शनाचा लाभ ६०० हून अधिक जिज्ञासूंनी घेतला. पोलीस उपनिरीक्षक श्री. रत्नदीप साळोखे यांनी प्रदर्शन पाहून अन्य गोष्टींना फाटा देऊन एक चांगला उपक्रम राबवल्यामुळे मंडळातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

सनातन संस्थेची वैशिष्ट्ये

सनातन संस्थेची स्थानपा राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करण्यासाठी झाली. प्रत्यक्ष जीवनात ‘अध्यात्म’ जगायला शिकवणारी सनातन संस्था !

सनातनचे राष्ट्ररक्षणविषयक कार्य !

सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.

राष्ट्ररक्षण

राष्ट्राच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी राष्ट्रहितदक्ष नागरिकांनी आता स्वत:च्या रक्षणाबरोबरच राष्ट्राचे रक्षण करणेही गरजेचे बनले आहे. याच दृष्टिकोनातून सनातन राष्ट्रभक्ती वाढवणारे, आपत्कालीन मदत व अग्निशमन, प्रथमोपचार प्रशिक्षणवर्ग ठिकठिकाणी विनामूल्य आयोजित करते.’