राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात सनातन संस्थेच्या साधिकेने केलेल्या प्रबोधनामुळे युवक प्रभावित

सनातन संस्थेच्या सौ. सुधा घाटगे यांनी सोलापूर येथील ७० फूट रस्त्यावरील, इंदिरानगर येथील चौकामध्ये ८-१० युवकांना राष्ट्रध्वजाची रांगोळी अन् फटाके यांमुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो, हे पटवून योग्य कृती काय करायला हवी, हे समजावून सांगितले.

मध्यप्रदेशमधील पलिया पिपरिया येथे श्रीमद्भक्तमाल कथेच्या कार्यक्रमात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र आणि धर्म यांविषयी मार्गदर्शन

पिपरिया येथील भाजपचे श्री. मनोहरलालजी बँकर यांनी आयोजित केलेल्या कथेच्या कार्यक्रमातही हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने धर्मशिक्षणाविषयीचे फलक, ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावून जनजागृती करण्यात आली.

रोहिंग्यांची हकालपट्टी करा ! – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती

रोहिंग्यांना भारतात स्थान देऊ नये आणि त्यांची हकालपट्टी करावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने विकास भवनासमोर ११ ऑक्टोबरला धरणे आंदोलन घेण्यात आले.

फटाक्यांद्वारे होणारी देवता आणि राष्ट्रपुरुष यांंची विटंबना थांबवा !

धर्मशास्त्रीय आधार नसलेल्या आणि राष्ट्राची हानी करणार्‍या फटाक्यांवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी

रोहिंग्या मुसलमानांना भारतातून त्वरित हाकला ! – समस्त हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

सरकारने दबावतंत्राला बळी न पडता रोहिंग्यांना भारतातून त्वरित हाकलून लावावे यासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने मुंबईतील धारावी आणि विक्रोळी तसेच नवी मुंबईतील सानपाडा या ठिकाणी आंदोलने करण्यात आली.

शत्रूराष्ट्र चीनच्या मालावर बहिष्कार : अंधेरी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात सनातनचा सहभाग

शत्रूराष्ट्र चीनच्या मालावर बहिष्कार घालण्याची शपथ घेऊन आपला राष्ट्राभिमान जागृत ठेवा, भारताच्या सुरक्षेला घातक ठरणार्‍या रोहिंग्या मुसलमानांना देशामध्ये आश्रय देऊ नका

नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

येथे हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांनी १८ सप्टेंबरला संविधान चौक येथे विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. ‘मोहरमच्या निमित्ताने दुर्गामूर्ती विसर्जनावर बंदी आणून मुसलमानांच्या सणांच्या वेळी हिंदु सणांवर बंदी आणण्याची पद्धत हा धार्मिक पक्षपात आहे’, असे मत सनातन संस्थेच्या सौ. मंगला पागनीस यांनी मांडले.

वणी (जिल्हा यवतमाळ) हिंदुत्वनिष्ठांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन ; सनातन संस्थेचा सहभाग

येथे हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी तहसील चौक, वणी येथे १६ सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत धरणे आंदोलन आयोजित केले. आंदोलनात ‘लव्ह जिहाद’ या भीषण समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याविषयी केंद्र सरकारला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला ! – श्रीमती (डॉ.) मृणालिनी भोसले, सनातन संस्था

भारतीय सीमेत घुसखोरी करून सतत भारताला पाण्यात पहाणार्‍या चीनला अद्दल घडवण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक आणि संघटना यांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याच्या संदर्भात आंदोलने, तसेच सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून मोहिमा चालू केल्या आहेत. याला समाजातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राष्ट्रहिताची भावना निर्माण होत आहे.

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखली

सावंतवाडी येथील बाजारपेठेत फेरीवाल्यांकडून होणार्‍या प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि स्टीकर यांच्या विक्रीविषयी सनातनचे साधक अन् हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी पोलिसांना लक्षात आणून दिल्यावर ही विक्री थांबवण्यात आली.