रत्नागिरी येथील राष्ट्रध्वज सन्मान बैठकीत सनातन संस्थेसह राष्ट्रप्रेमी संघटनांचा सहभाग

राष्ट्रध्वजाचा मान राखला जावा, यासाठी नुकतेच जिल्हाधिका-यांना श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु राष्ट्र सेना, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी राष्ट्रप्रेमी संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते

सनातन संस्थेतर्फे राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठीं यवतमाळ येथे पोलीस उपअधीक्षकांना निवेदन

जे कोणी ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा मान राखणार नाहीत, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, या मागणीचे निवेदन ३० जुलैला पोलीस उपअधीक्षक नरुल हसन यांना देण्यात आले.

अयोध्या येथे सनातन संस्थेच्या वतीने प्रत्यक्ष भेटी आणि बैठका यांद्वारे ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

कुंभमेळ्यात सनातन संस्थेच्या संपर्कात आलेल्या अयोध्येतील धर्मप्रेमी व्यक्तींशी ‘हिंदु राष्ट्र’ या विषयावर संवाद साधण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने या भागात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवले.

काश्मीरप्रमाणे देशात ‘इस्लामिक स्टेट’ येण्यापूर्वी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा ! – चेतन राजहंस

वर्ष १९९० मध्ये काश्मीर खोर्‍यामध्ये ‘रलिव्ह’, ‘चलिव्ह’ आणि ‘गलिव्ह’, अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. याचा अर्थ ‘इस्लाम स्वीकारा, काश्मीर सोडा अथवा मृत्यूला सामोरे जा’, असा होतो.

प्रयागराज : सनातन संस्थेने आयोजित केलेल्या क्रांतीकारकांच्या छायाचित्र प्रदर्शनास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने २६ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता ‘अक्षयवट आणि बडे हनुमान’ या मार्गावर सनातन संस्था व हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष’ यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

२५ डिसेंबर २०१८ ते २ जानेवारी २०१९ या कालावधीत फटाके फोडण्यास बंदी घालण्याची मागणी

सनातन संस्थेच्या सौ. रोहिणी जोशी यांनी सांगितले की, केरळमध्ये लक्षावधी महिला आणि पुरुष भक्तांनी शबरीमला मंदिराच्या परंपरेच्या रक्षणार्थ मोठ्या प्रमाणात मोर्चे, आंदोलने आदी सनदशीर माध्यमातून निषेध नोंदवला.

लासलगाव (जिल्हा नाशिक) : युवकांना व्यसनाच्या आहारी ढकलणार्‍या सनबर्न फेस्टीव्हलला हिंदुत्वनिष्ठांचा विरोध !

 पाश्चात्त्य चंगळवादाला खतपाणी घालणा-या, हिंदु संस्कृतीला घातक असणा-या आणि युवक-युवतींंनी व्यसनाच्या आहारी ढकलणा-या ‘सनबर्न फेस्टीव्हल’ला अन् हिंदुत्वनिष्ठांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या षड्यंत्राला येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करण्यात आला.

मक्का-मदिना या प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी मुसलमान युवती आणि हिंदु युवक यांची प्रेमकथा दाखवण्याचे धाडस निर्माते दाखवतील का ? – डॉ. दिक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

लव्ह जिहाद चित्रपटसृष्टीत पहिल्यापासून आहेच. त्याचाच परिपाक असणारा केदारनाथ हा चित्रपट म्हणजे त्याची परिसीमाच म्हणावी लागेल. मक्का-मदिना या प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी मुसलमान युवती आणि हिंदु युवक यांची प्रेमकथा दाखवण्याचे धाडस निर्मात्यांनी दाखवले असते का, असा प्रश्‍न सनातन संस्थेच्या डॉ. दिक्षा पेंडभाजे यांनी उपस्थित केला.

भारतमातेचे तुकडे करण्यासाठी शेजारची शत्रूराष्ट्रे टपून बसली आहेत ! – काशिनाथ प्रभु, सनातन संस्था

भारतमातेचे तुकडे करण्यासाठी शेजारची शत्रूराष्ट्रे टपून बसली आहेत. भारताच्या अंतरबाह्य दोन्ही व्यवस्था सुदृढ नाहीत.

१९७६ प्रमाणे पुन्हा घटनादुरुस्ती करून ‘सेक्युलर’च्या जागी ‘हिंदु राष्ट्र’ ही सुधारणा करायला हवी ! – आधुनिक वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान भारताला दिले, त्यात ‘सेक्युलर’ हा शब्द कुठेही नाही; मात्र १९७६ मध्ये या संविधानात ४२ वी घटनादुरुस्ती करून ‘सेक्युलर’ हा शब्द घुसडून आणीबाणीच्या काळात हिंदूंची घोर फसवणूक केली गेली.