हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’त ५० सहस्रांहून अधिक हिंदूंचा सहभाग ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी भारतभरात पुजारी, संत आणि मान्यवर यांच्या वतीने १ सहस्र ११९ मंदिरांमध्ये साकडे घालण्यात आले, तर महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तेलंगाणा या राज्यांत २३ ठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

मुंबई येथे ‘हिंदू एकता दिंडी’त एकवटलेल्या धर्मप्रेमींकडून हिंदु राष्ट्राचा जयघोष !

परात्पर गुरु डॉ. आठवले याच्या जन्मोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या या दिंडीमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील १ सहस्र ५०० हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. हिंदुत्वनिष्ठ, सामाजिक आणि संप्रदाय अशा २५ संघटनांचा सहभाग होता.

हिंदूजनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेली विविध जिल्ह्यांतील ‘हिंदू एकता दिंडी’ !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले.

जळगाव येथील भव्य हिंदू एकता दिंडी !

जे कुणी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी होतील, त्यांचा निश्चित उद्धार होईल, असे मार्गदर्शन सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ते १९ मे या दिवशी झालेल्या ‘हिंदू एकता दिंडी’त बोलत होते. या दिंडीस एक सहस्राहून अधिक हिंदूंची उपस्थिती लाभली.

जळगाव येथे हिंदू एकता दिंडीच्या माध्यमातून धर्मप्रेमींचे संघटन !

सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते सनातनचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे छायाचित्र ठेवलेल्या पालखीचे पूजन करण्यात आले.

चिपळूण (रत्नागिरी) : ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून हिंदुत्वनिष्ठांनी दाखवला ‘हिंदूऐक्याचा आविष्कार’

हिंदूंच्या उत्सव मिरवणुकांवर होणारी आक्रमणे, गोहत्या, धर्मांतरण, लव्ह जिहाद आदी संकटांवर हिंदु राष्ट्र निर्मिती हा एकमेव उपाय आहे. या देशात हिंदुत्वाच्या विचारांचे ध्रुवीकरण होत आहे. याला बळकटी देण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रयत्न करायला हवेत.

सोलापूर येथे ‘हिंदू एकता दिंडी’द्वारे ‘हिंदु राष्ट्रा’चा हुंकार !

या प्रसंगी श्री. बापू ढगे म्हणाले, ‘‘सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना चालू केल्यावर माझ्यात आमूलाग्र पालट जाणवत आहे. त्यामुळे समाजातील लोकांची नुसती इच्छा असून उपयोग नाही, तर हिंदु राष्ट्राच्या कार्यात सहभागी होण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे.’’

नाशिक येथे १५ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने नाशिक येथे १५ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. दिंडीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्फुल्लिंग चेतवले गेले.

भव्य ‘हिंदू एकता दिंडी’च्या माध्यमातून पुण्यनगरीत संचारले हिंदू नवचैतन्य !

भगवे ध्वज, दुमदुमणाऱ्या घोषणा अन् दिंडीमध्ये सहभागी झालेल्यांच्या मनातील गुरूंविषयीचा अपार कृतज्ञताभाव यांमुळे वातावरण हिंदु नवचैतन्याने भारित झाल्याचे उपस्थितांनी अनुभवले.

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या  जन्मोत्सवाच्या निमित्त सनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात “हिंदू एकता दिंडीचे” आयोजन

या फेरीसाठी सनातन संस्थेचे  धर्मप्रचारक संत सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली.