नंदुरबार येथील उद्योजक नितेश अग्रवाल यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना सनातनच्या संस्कार वह्यांचे वाटप !
जळगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना उद्योजक नितेश अग्रवाल यांच्या वतीने सनातन संस्थेच्या संस्कार वह्यांचे आणि अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सनातन संस्थेची संस्कार वही विद्यार्थ्यांच्या मनातील राष्ट्रभावना जागृत ठेवण्यासाठी निश्चित प्रेरणा देत राहील, असा विश्वास या प्रसंगी श्री. अग्रवाल यांनी व्यक्त केला.