चिनी ‘ड्रॅगन’ला रोखण्यासाठी चिनी वस्तू आणि राख्या यांवर बहिष्कार घाला ! – आंदोलनाद्वारे एकमुखी मागणी
कुरापतखोर अरुणाचल प्रदेश आणि लडाख येथे सीमावाद चालू ठेवण्यासमवेत आता सिक्कीममध्येही घुसखोरी करत डोकलाम हा चीनचा भूभाग असल्याचे चीन सांगत आहे. असे असतांनाही भारत चीनशी व्यापार वाढवत आहे आणि चिनी ‘ड्रॅगन’ भारताच्या घराघरांत पोहोचवत आहे.