सनातन संस्थेच्या वतीने प्रवचनांच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या अध्यात्मशास्त्रीय माहितीचा प्रसार

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने ठिकठिकाणी गणेशोत्सवाविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती सांगणारी प्रवचने आयोजित करण्यात आली होती. त्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रेंदाळ (जिल्हा कोल्हापूर) येथे गणेशपूजनाविषयीच्या अध्यात्मशास्त्र या विषयावरील प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती प्रतिष्ठापनाच्या निमित्ताने येथील श्री ॐ सेवाभावी संस्था यांच्या मंडळात २५ ऑगस्टला सामूहिक गणेशाचा नामजप आणि ‘गणेश पूजनाविषयीचे अध्यात्मशास्त्र’ या विषयावर प्रवचन पार पडले.

जळगाव पिपल्स बँकेत ‘श्री गणेशपूजेतील अध्यात्मशास्त्र’ विषयावर प्रवचन

जळगाव शहरातील प्रख्यात जळगाव पिपल्स बँकेत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘श्री गणेशपूजेतील अध्यात्मशास्त्र’ आणि ‘भारतीय सण-उत्सवामांगील विज्ञान’ या विषयांवर व्याख्यान घेण्यात आले.

चीनला अद्दल घडवण्यासाठी चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला ! – श्रीमती (डॉ.) मृणालिनी भोसले, सनातन संस्था

भारतीय सीमेत घुसखोरी करून सतत भारताला पाण्यात पहाणार्‍या चीनला अद्दल घडवण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिक आणि संघटना यांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याच्या संदर्भात आंदोलने, तसेच सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून मोहिमा चालू केल्या आहेत. याला समाजातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून राष्ट्रहिताची भावना निर्माण होत आहे.

सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखली

सावंतवाडी येथील बाजारपेठेत फेरीवाल्यांकडून होणार्‍या प्लास्टिकचे राष्ट्रध्वज आणि स्टीकर यांच्या विक्रीविषयी सनातनचे साधक अन् हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी पोलिसांना लक्षात आणून दिल्यावर ही विक्री थांबवण्यात आली.

लासलगाव येथे ३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !

लासलगाव येथे ३ शाळांमध्ये राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयावर प्रवचन घेण्यात आले. राष्ट्रभक्तीच्या संदर्भातील माहिती प्रवचनांमधून देण्यात आली.

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेने जीवन आनंदी बनेल – शिक्षकांचा अभिप्राय

जळगाव येथील शिक्षकांसाठी सनातन संस्थेच्या वतीने २६ ऑगस्टला ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया कशी राबवावी ?’ याविषयी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत ४५ शिक्षकांनी सहभाग घेतला.

श्री गणेशोत्सवाच्या संदर्भातील धर्मशास्त्र सांगणे, हा स्तुत्य उपक्रम ! – शिक्षकांची प्रतिक्रिया

राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल (स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था) येथे श्री गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेश या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये शास्त्रानुसार गणेशमूर्ती कशी असावी ? त्याचे पूजन कसे करावे ? श्री गणेशाची कृपा आपल्यावर होण्यासाठी या काळात कसे प्रयत्न करावेत ?याविषयी विस्तृत माहिती सांगण्यात आली.

चोपडा (जळगाव) येथे पंकज विद्यालय येथील शिक्षकवृंदासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन या विषयावर कार्यशाळा

चोपडा येथील पंकज विद्यालयात शिक्षकांसाठी सनातन संस्थेच्या वतीने २६ ऑगस्टला स्वभावदोष आणि अहं निमूर्लन प्रक्रिया कशी राबवावी ? याविषयी कार्यशाळा घेण्यात आली.

कळंबोली येथे हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी करत असलेले कार्य प्रभावीपणे आणि नियमितपणे साधना म्हणून करण्याचा निर्धार कार्यशाळेतील धर्मप्रेमींनी केला.