धर्म, राष्ट्र आणि समाज यांची व्यवस्थित घडी बसवणे म्हणजेच हिंदु राष्ट्र होय – सौ. विदुला हळदीपूर, सनातन संस्था

सध्या हिंदु संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात अवमान केला जात आहे. धर्माचरणानेच धर्माची पुनर्स्थापना होणार आहे. त्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. धर्म, राष्ट्र आणि समाज यांची व्यवस्थित घडी बसवणे म्हणजेच हिंदु राष्ट्र होय.

इंदूर येथील ‘हिंदु आध्यात्मिक आणि सेवा’ मेळ्यात सनातन संस्थेचा सहभाग

सनातन संस्थेच्या वतीने दत्त जयंतीच्या दिवशी बांगर (देवास) आणि इंदूर येथे ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि धर्मशिक्षण देणारे फ्लेक्सचे फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. बांगर येथे १० डिसेंबरला झालेल्या भंडार्‍यातही हे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वादग्रस्त जादूटोणाविरोधी कायद्याची शासकीय समिती विसर्जित न केल्यास राज्यभर आंदोलन !

तत्कालीन काँग्रेस सरकारने जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेल्या शासकीय समितीचे (PIMC) सहअध्यक्ष श्याम मानव, सदस्य अविनाश पाटील, मुक्ता दाभोलकर, माधव बागवे, छाया सावरकर आदी वादग्रस्त आहेत. त्यांच्या ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत.

अकोला येथे दत्त जयंती निमित्त लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला जोधपूर येथील भगवतभूषण राधाकृष्ण महाराज यांची भेट

अकोला येथे दत्त जयंती निमित्त लावलेल्या सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनात जोधपूर येथील भगवतभूषण राधाकृष्ण महाराज यांनी भेट दिली.

पिंपरी येथील वाचक मेळाव्यात सनातन संस्थेच्या वतीने ‘साधना’ ह्या विषयावर मार्गदर्शन

२९ ऑक्टोबर या दिवशी येथील दक्षिणमुखी मारुति मंदिराच्या सभागृहात आयोजित केलेला ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचा मेळावा उत्साहात पार पडला. या प्रसंगी उपस्थित वाचकांनी ‘सनातन प्रभात’विषयी आपुलकीची भावना व्यक्त केली.

सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये युवा पिढीसाठी मार्गदर्शन

युवा साधक प्रशिक्षण शिबीराच्या माध्यमातून साधनेचा पाया भक्कम होईल ! – सौ. संगीता घोंगाणे, प्रसारसेविका

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात युवा साधकांना साधना व व्यक्तिमत्त्व विकास यांवर मार्गदर्शन

शिबिराच्या कालावधीत युवा साधकांना धर्माचरणाचे महत्त्व, साधनेत भावजागृतीचे महत्त्व, वाईट शक्तींचा त्रास आणि त्यावरील आध्यात्मिक उपाय या विषयांवर मार्गदर्शन अन् सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देण्यात आली.

लातूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या ५४ व्या वार्षिक अधिवेशनात सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

लातूर येथील महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या ५४ व्या वार्षिक अधिवेशनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाला महाराष्ट्रातील नामांकित वाचनालय प्रमुखांनी भेट देऊन त्यांच्या ग्रंथालयासाठी सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ खरेदी करणार असल्याचे सांगितले.

गुंटूर (आंध्रप्रदेश) येथील ‘विजयवाडा बूक फेअर’मध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन

गुंटूर – शहरात प्रथमच विजयवाडा बूक फेअरमध्ये विविध ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.येथे सनातनचे तेलुगु भाषेतील ग्रंथ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ यांची भेट देऊन राष्ट्र अन् धर्म कार्यात योगदान देणारे व्यावसायिक !

भारतभरातील काही हितचिंतक विविध सणांच्या निमित्ताने नातेवाईक, परिचित, तसेच आस्थापनातील कर्मचारी यांना ग्रंथ आणि लघुग्रंथ भेट स्वरूपात देऊन हे अमूल्य ग्रंथभांडार सर्वदूर पोहोचवत आहेत.