बोईसर आणि कोपरखैरणे येथे मंदिरांची स्वच्छता !

बोईसर येथील हनुमान मंदिराची स्वच्छता धर्मप्रेमी आणि साधक यांनी केली. या वेळी मंदिर विश्‍वस्तांनी मंदिरात साकडे घालण्यासाठी अनुमती दिली. कोपरखैरणे येथील श्री चिकानेश्‍वर शिव मंदिराचीही स्वच्छता करण्यात आली.

राष्ट्रपुरुषांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात वैध मार्गाने आवाज उठवा ! – (सदगुरु) नंदकुमार जाधव, सनातन संस्था

राजस्थानमधील इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या संदर्भ पुस्तकात लोकमान्य टिळक यांचा ‘आतंकवादाचे जनक’, असा अवमानकारक उल्लेख करण्यात आला आहे.

भादरा (राजस्थान) येथे सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भादरा (राजस्थान) येथील प्रबलजी महाराज यांच्या आश्रमामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातनच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

जळकोट (जिल्हा नांदेड) येथे सनातन संस्थेकडून भागवत सप्ताहात मार्गदर्शन

जळकोट – येथील सनातन संस्थेचे हितचिंतक आणि विज्ञापनदाते, तसेच जळकोट पंचायत समितीचे बांधकाम सभापती श्री. रमाकांत रायवार यांनी आयोजिलेल्या भागवत सप्ताहात सनातन संस्थेच्या सौ. अनिता बुणगे यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले होते.

पंढरपूर येथील चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेविषयीच्या समस्या सोडवा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निवेदनाद्वारे मागणी

पंढरपूर येथील चंद्रभागा नदी स्वच्छतेविषयी अनेक समस्या दिसून येत आहेत. त्याविषयी येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अभिजीत बापट यांना निवेदन देण्यात आले.

पंढरपूर येथे शिवरात्रीनिमित्त सनातनच्या ग्रंथप्रदर्शनास उत्तम प्रतिसाद

पंढरपूर येथील श्री संत तनपुरे महाराज मठात महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाला अनेक भाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

सोलापूर येथे महाराष्ट्र राज्यातील ग्रंथपालांच्या राज्यअधिवेशनात सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सोलापूर येथे १७ फेब्रुवारी या दिवशी हुतात्मा स्मृती मंदिर येथे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ग्रंथपालांचे एकदिवसीय अधिवेशन पार पडले. या अधिवेशनात सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

भारतीय संविधानात ‘सेक्युलर’ या शब्दाची कुठलीही व्याख्या नाही ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

प्रत्यक्षात ‘सेक्युलर’ या शब्दाची कोणतीही व्याख्या किंवा अर्थ भारतीय संविधानात दिलेला नाही. त्यामुळे ‘सेक्युलर’ शब्दाचे ‘धर्मनिरपेक्षता’, ‘सर्वधर्मसमभाव’, ‘लौकिकवाद’ असे विविध प्रकारचे अर्थ आज अनेकांनी काढले आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानात सनातनचा सहभाग

डॉ. लहाने समितीने गेल्या तीन वर्षांत एकाही रुग्णालयाची पडताळणी केलेली नाही कि शासनाला कसलाही अहवाल सादर केलेला नाही. शासनाची याविषयीची अनास्था चिंताजनक आहे.

जळगाव जिल्ह्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या विरोधात विविध उपक्रमांद्वारे प्रबोधन

सनातन संस्थेचे श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी धर्मचरणाचे महत्त्व, तसेच धर्मरक्षणासाठी सर्वांनी संघटित होणे आवश्यक असल्याचे सांगितले.