देवद (पनवेल) येथील युवा साधक प्रशिक्षण शिबिर

साधक हा नम्र, इतरांचा विचार करणारा, स्वतःची चूक स्वीकारणारा, सत्य बोलणारा, निरपेक्ष प्रेम करणारा, व्यष्टी साधना तळमळीने करणारा असतो. म्हणूनच आपल्यात साधकत्व येण्यासाठी गुणांची जोपासना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी युवा शिबिरार्थींना केले.

रामनाथी येथील सनातन आश्रमात चार दिवसीय प्रांतीय युवा साधक प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ !

नियमित साधना कशी करावी? याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने रामनाथी येथील सनातन आश्रमात १६ ते १९ नोव्हेंबर या काळात प्रांतीय युवा साधक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी धर्माचरण आणि साधना आवश्यक ! – डॉ. पूनम शर्मा, सनातन संस्था, विलासपूर

नामजपातून धर्मरक्षणासाठी आपल्यामध्ये आत्मबळ निर्माण होईल, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक बळ मिळेल, असे उद्गार सनातन संस्थेच्या डॉ. पूनम शर्मा यांनी ‘साधनेचे महत्त्व’ या विषयावर बोलतांना काढले.

१९७६ प्रमाणे पुन्हा घटनादुरुस्ती करून ‘सेक्युलर’च्या जागी ‘हिंदु राष्ट्र’ ही सुधारणा करायला हवी ! – आधुनिक वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, सनातन संस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान भारताला दिले, त्यात ‘सेक्युलर’ हा शब्द कुठेही नाही; मात्र १९७६ मध्ये या संविधानात ४२ वी घटनादुरुस्ती करून ‘सेक्युलर’ हा शब्द घुसडून आणीबाणीच्या काळात हिंदूंची घोर फसवणूक केली गेली.

बेळगाव येथील सनातनचे साधक प्रसाद हळदणकर यांनी ‘हॅगो’वर होणारे श्री दुर्गादेवीचे विडंबन रोखले !

‘हॅगो’ हे एक ऑनलाईन गेमचे (खेळाचे) ‘अ‍ॅप्लिकेशन’ आहे. यावर एकाच वेळी ३ लक्षांपेक्षा अधिक ग्राहक जोडलेले असतात. हे ‘अ‍ॅप्लिकेशन’ उघडल्यावर त्यावर श्री दुर्गादेवीचे विडंबनात्मक चित्र असल्याचे सनातनचे साधक श्री. प्रसाद हळदणकर यांना लक्षात आले.

डोंबिवली येथील शबरीमला मंदिरप्रवेश प्रकरणी काढलेल्या निषेध फेरीत सनातन संस्थेचा सहभाग

तुम्हाला किती लोकांना हिंदूंच्या धार्मिक पुस्तकांविषयी माहिती आहे ? धर्मग्रंथांतील विचार वर्षानुवर्षे चालू आहेत. एका झटक्यात ते बदलू शकत नाहीत. अन्य धर्मियांच्या संदर्भात असे होत नाही; त्यांच्यावर अन्याय झाला की ते एकत्र येतात.

त्रिचूर (केरळ) येथे सनातनच्या वतीने जिज्ञासूंना साधना आणि स्वभावदोष अन् अहं निर्मूलन यांविषयी मार्गदर्शन

सनातन संस्थेच्या कु. रश्मी परमेश्वरन् आणि श्री. नंदकुमार कैमल यांनी ‘साधना, आध्यात्मिक उपाय, अध्यात्माचे महत्त्व, स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाचे महत्त्व’ यांविषयी मार्गदर्शन केले.

जळगाव येथे हिंदू संघटन कार्यशाळेत सनातन संस्थेचा सहभाग

राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतांना ईश्वरी अधिष्ठान आवश्यक आहे; म्हणून प्रत्येक धर्मप्रेमीने कार्य करतांना वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीच्या उद्देशाने साधना करायला हवी.

नागपूर येथे नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाप्रसंगी सनातन संस्थेचा सहभाग

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा करण्याविषयीचे  निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री रवींद्र खंजाजी यांना ४ ऑक्टोबर या दिवशी देण्यात आले.

नगर येथे सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांच्या प्रदर्शनाच्या धर्मरथाचे पूजन

येथील गांधी मैदान येथे १ ऑक्टोबर या दिवशी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांच्या प्रदर्शनाचा फिरता धर्मरथ लावण्यात आला होता.