कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रवचन पार पडले !
कोची (केरळ) येथील दत्त-हनुमान मंदिरात हनुमान जयंतीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने २३ एप्रिल या दिवशी प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला. प्रवचन झाल्यावर उपस्थित जिज्ञासूंनी दत्ताच्या नामजपाविषयी सविस्तर जाणून घेतले.