महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेकडून देहली शहर, उत्तरप्रदेशातील काही शहरांत, भादरा (राजस्थान) तसेच तेलंगण येथे प्रवचन अन् ग्रंथप्रदर्शन

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेकडून देहली शहर, उत्तरप्रदेशातील काही शहरांत, भादरा (राजस्थान) तसेच तेलंगण येथे प्रवचन अन् ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.

चेन्नई येथील देवी करूमारी अम्मन मंदिरात शिवरात्री पूजेच्या कार्यक्रमात सनातन संस्थेकडून प्रवचन

चेन्नई (तमिळनाडू) येथील नंगमबक्कम भागातील श्री देवी करूमारी अम्मन मंदिरात सनातन संस्थेच्या साधिका सौ. कल्पना बालाजी यांनी तमिळ नववर्ष, वाढदिवस कसा साजरा करावा ?, शिवरात्रीचे महत्त्व, कुलदेवतेचा आणि दत्ताचा नामजप करण्याविषयीचे महत्त्व, या विषयांवर मार्गदर्शन केले.

कोची : ‘अमृता स्कूल ऑफ आर्टस् अँड सायन्स’ येथील पुस्तक मेळ्यात सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन

१४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत येथील माता अमृतानंदयी यांनी स्थापन केलेल्या ‘अमृता स्कूल ऑफ आर्टस् अँड सायन्स’ येथे ‘समग्र – नॅशनल सेमिनार ऑन इंडियन लिटरेचर अँड कल्चर’ हा कार्यक्रम आयोजित मेळ्यात सनातन संस्थेने ग्रंथप्रदर्शन कक्ष लावले होते.

सनातन संस्थेच्या वतीने चेन्नई येथे सत्संग सोहळा

सनातन संस्थेच्या वतीने चेन्नई (तमिळनाडू) येथील अरूम्बक्कम भागातील पेरूमल स्कूल या ठिकाणी ९ फेब्रुवारी या दिवशी विशेष सत्संग सोहळा पार पडला.

ब्रह्मपूर येथील शिव मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आले ग्रंथ आणि फ्लेक्स प्रदर्शन

सनातन संस्थेच्या वतीने जळगाव शहरातील ओंकारेश्वर महादेव मंदिर, एस्.टी. वर्कशॉप येथील महादेव मंदिर, शिवधाम निमखेडी, भुसावळ येथील रानातील महादेव मंदिर, नर्मदेश्वर महादेव मंदिर, चोपडा येथील हरेश्वर मंदिर, जामनेर येथील सोनबर्डी महादेव मंदिर, पाचोरा आणि ब्रह्मपूर येथील महादेव मंदिर येथे ग्रंथ आणि फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.

महाशिवरात्रीनिमित्त रायगड जिल्ह्यात सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद !

रायगड जिल्ह्यामध्ये महाशिवरात्रीनिमित्त ७१ ठिकाणी सनातन संस्थेची ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती. त्याला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

नवी देहलीतील ‘संस्कार कॉन्व्हेंट’ शाळेमध्ये सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला चांगला प्रतिसाद

नांगलोई येथील ‘संस्कार कॉन्व्हेंट’ शाळेमध्ये सनातन संस्थेकडून ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने उत्तरप्रदेशच्या जौनपूर आणि चंदौली जिल्ह्यांमध्ये हिंंदु राष्ट्र संपर्क अभियान

भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी जागृती करण्याच्या दृष्टीने, तसेच समविचारी व्यक्ती आणि संस्था यांचे संघटन होण्याच्या दृष्टीने उत्तरप्रदेशच्या जौनपूर आणि चंदौली या २ जिल्ह्यांमध्ये हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याद्वारे हिंदु राष्ट्र संपर्क अभियान आयोजित करण्यात आले.

जीवनात आनंद मिळवण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सौ. धनश्री केळशीकर, सनातन संस्था

सत्संग, सत्सेवा, त्याग, प्रीती अशा टप्प्याटप्प्याने साधना केल्यास आपण आपल्या जीवनात आनंद अनुभवू शकतो, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी सानपाडा येथील हिमगिरी सोसायटीमध्ये आयोजित केलेल्या प्रवचनात केले.

भोसरी (जिल्हा पुणे) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन

पुणे इंद्रायणीनगर भागातील वैष्णवी मंदिराच्या प्रांगणात ९ फेब्रुवारी या दिवशी ‘आनंदी जीवनासाठी साधना’ या विषयावर प्रवचन आयोजित केले होते.