पाल्यांना सुसंस्कारित बनवून त्यांना चांगल्या सवयी लावणे ही काळाची आवश्यकता ! – सौ. कल्पना थोरात, सनातन संस्था

आपल्या पाल्यांना सुसंस्कारीत करणे आणि त्यांना चांगल्या सवयी लावणे ही काळाची आवश्यकता असून ते पालकांचे मुख्य कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या साधिका सौ. कल्पना थोरात यांनी केले. त्या ‘ऑनलाईन बालसंस्कार वर्गाच्या विशेष भागा’त बोलत होत्या.

उत्तराखंड विधानसभेचे अध्यक्ष श्री. प्रेमचंद अग्रवाल यांच्याकडून सनातनच्या कार्याची प्रशंसा !

दळणवळण बंदीच्या काळापासून सनातन संस्थेचे ऑनलाईन सत्संग चालू केल्याने जिज्ञासूंना त्याचा पुष्कळ लाभ झाला’, असे सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी श्री. अग्रवाल यांना सांगितले. त्यावर श्री. प्रेमचंद अग्रवाल यांनी या कार्याची प्रशंसा केली.

फरीदाबाद आणि मथुरा येथील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने फरीदाबाद येथे सेक्टर २८ मधील शिवशक्ती मंदिर आणि ग्रेटर फरीदाबाद येथील एस्.आर्.एस्. रेसिडेन्सी सेक्टर ८८ मधील शिवमंदिर या ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले.

महाशिवरात्रीनिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनांना जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद

महाशिवरात्रीनिमित्त म्हणजेच ११ मार्च या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने बिहारमधील पाटणा, गया, समस्तीपूर आणि उत्तरप्रदेशमधील भदोही, गाझीपूर, वाराणसी, अयोध्या अन् सुलतानपूर येथे सनातनचे ग्रंथ, तसेच उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनांना जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

देवतांचे विडंबन रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

हिंदूंच्या श्रद्धा, अस्मिता आणि परंपरा यांना आजच्या व्यवस्थेत कोणतेही संरक्षण नाही. विज्ञापने, नाटके, चित्रपट, वेब सीरिज, स्टँड अप कॉमेडी आदी माध्यमांतून हिंदूंच्या देवतांचे वाटेल तसे विडंबन केले जात आहे.

आपत्काळात तरून जाण्यासाठी भक्त होणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सध्या आपत्काळास प्रारंभ झाला आहे. या आपत्काळात तरून जाण्यासाठी भगवंताची भक्ती करणे आवश्यक आहे. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून शुद्ध मनाने भक्ती म्हणजेच साधना केली पाहिजे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.

सनातन संस्था आयोजित सामूहिक नामजप कार्यक्रमाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सनातन संस्था वतीने नुकताच दत्त जयंती निमित्त ‘ऑनलाईन’ स्वरूपात आयोजित केलेल्या सामूहिक नामजप कार्यक्रमाला समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दत्त जयंती निमित्त ‘ऑनलाईन’ सत्संग आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन

दत्त जयंती निमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने नुकतेच एका ‘ऑनलाईन’ सत्संगाचे आयोजन करण्यात आले. या वेळी सनातनच्या साधिका कु. पूनम चौधरी आणि सौ. राजरानी माहुर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कु. चौधरी यांनी श्री दत्त यांनी केलेल्या २४ गुण गुरूंविषयी माहिती दिली.

मंगळुरू (कर्नाटक) येथील ‘युथ ऑफ जी.एस्.बी’ यू ट्यूब चॅनलवर सनातन संस्थेचा सहभाग

मंगळुरू (कर्नाटक) येथील ‘युथ ऑफ जी.एस्.बी’ यू ट्यूब चॅनेलवर नुकताच ‘धर्मो रक्षति रक्षितः’ या कोंकणी भाषेतील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

योग्य साधना हेच जीवनातील प्रत्येक समस्यांचे उत्तर ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

तरी प्रत्येकाने कुलदेवतेचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप, अशी योग्य साधना केल्यास त्यांनाही आनंदप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होईल, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले.