सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ ‘ऑनलाईन’ व्याख्यानमाला

काळानुसार योग्य साधना कशी करावी, तसेच धर्माचरणाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणारे ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्ग आणि ‘धर्मसत्संग’ यांमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले

महामारी आणि तिसरे महायुद्ध यांतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, तसेच तणावमुक्तीसाठी साधना करणे आवश्यक ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

महामारी आणि तिसरे महायुद्ध यांतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे. आपत्काळात तणाव वाढतो. स्वयंसूचना दिल्यास तो घालवता येतो. तणावमुक्तीसाठी साधनेविना पर्याय नाही, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी केले.

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीयांच्या वतीने व्यापक प्रमाणात करण्यात आला ‘ऑनलाईन’ अध्यात्मप्रसार !

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने धर्माचरण कसे करावे ? आणि या सणाचे आध्यात्मिक महत्त्व याविषयी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली अन् सातारा या जिल्ह्यांमध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ पद्धतीने सामाजिक माध्यमे यांद्वारे अध्यात्मप्रसार करण्यात आला.

साधना करून अधिवक्त्यांनी हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहभागी व्हावे ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

प्रशासनाला निवेदने देणे आणि पोलिसांत तक्रारी प्रविष्ट करणे आदी सर्व गोष्टी अधिवक्त्यांच्या वतीने होऊ शकतात. यांसह दंगलग्रस्त भागातील पीडित हिंदू आणि गोरक्षक आदी सर्व हिंदू बांधवांना अधिवक्ते वेळोवेळी साहाय्य देऊ शकतात. अधिवक्ते करत असलेल्या कार्याला त्यांनी साधनेची जोड द्यायला हवी. ईश्‍वरावर निष्ठा असेल, तर अशक्यही शक्य होऊ शकते. राष्ट्र-धर्मावर होत असलेल्या आघातांविरोधात लढण्यासाठी अधिवक्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य आणि मुंबई उच्च न्यायालयाचे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने तणावमुक्तीसाठी ‘विदर्भस्तरीय ऑनलाईन शिक्षक परिसंवाद’!

नामजप केल्याने मन स्थिर राहून आनंदी होते. तसेच भीती आणि काळजी यांविषयीचे विचार न्यून होतात. असे मार्गदर्शन सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांनी विदर्भस्तरीय ऑनलाईन ‘शिक्षक परिसंवादा’त केले. या वेळी पू. पात्रीकरकाका यांनी कुलदेवी आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्वही सांगितले.

कोरोनाकाळात मन स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

दळणवळण बंदीमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीचा अपलाभ उठवून धर्मांतर, इ. आघात हिंदूंवर होत आहेत.या संकटांमध्ये म्हणजेच कोरोनाकाळात मन स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे.

कोरोनासारख्या संकटकाळात स्थिर रहाण्यासाठी साधना आवश्यक ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

कोरोनासारख्या संकटकाळात मनाची स्थिती स्थिर रहाण्यासाठी साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. जिल्ह्यातील धर्मप्रेमींसाठी नुकतेच एका ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन म्हणजे भारतीयत्वाचे पुनर्वसन ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

ज्या भीतीच्या वातावरणात काश्मिरी हिंदूंचे विस्थापन झाले, त्या वातावरणात पुन्हा काश्मिरी हिंदूंनी जाऊन रहाणे हे अशक्य आहे. काश्मिरी हिंदूंना प्राधान्याने सुरक्षेची आवश्यकता आहे आणि ती सुरक्षा शासनाने पुरवायला हवी.

‘कोरोना महामारीत मनाला स्थिर कसे करावे ?’ या विषयावर समाजासाठी उद्बोधक चर्चासत्र

आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे, हा महत्त्वपूर्ण उपाय आहे. आत्मबळ वाढल्यास व्यक्ती कोरोनासारख्या महामारीतही स्थिर राहू शकते. व्यक्तीला कर्मफलन्यायानुसार प्रारब्ध भोग भोगावे लागतात; परंतु साधना केल्यामुळे प्रारब्ध भोगाची तीव्रता न्यून होते, तसेच ते सुसह्य होते. कोरोनासाठीही साधना करणे, हाच उपाय आहे. कोरोनाच्या बातम्या पाहून अनेकांना ताण येत आहे. या ताणापासून मुक्तता मिळवण्यासाठी नामजप केल्यास लाभ होतो.