स्वत:मधील शिवतत्त्व, दुर्गातत्त्व जागृत करून धर्मकार्य करण्यास सिद्ध व्हा ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, सनातन संस्था
आपण ज्या देशात जन्मलो त्या मातृभूमीचे ऋण आपल्याला फेडायचे असेल, तर पुरुषांची त्यांच्यातील शिवतत्त्व आणि महिलांनी त्यांच्यातील दुर्गातत्त्व जागृत करून धर्मकार्य करण्यास सिद्ध व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांनी केले. त्या साधना सत्संग जिज्ञासू शिबिरात बोलत होत्या.