‘मिरज केमिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष विशाल दुर्गाडे यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी अर्पण औषधांचे सनातन संस्थेकडून वितरण !

स्वत:च्या वाढदिवसाच्या निमित्ताने पूरग्रस्तांना औषधे अर्पण देणार्‍या मिरज केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. विशाल दुर्गाडे यांची कृती आदर्शवत् आहे !

येणार्‍या आपत्काळात साधना केल्यानेच तणावमुक्त जीवन जगता येऊ शकेल ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

 जीवनातील तणाव हा बाह्य कारणांमुळे केवळ १० टक्के, तर आंतरिक कारणांमुळे ९० टक्के असतो. यावर केवळ साधनेद्वारे मात करता येऊन खर्‍या अर्थाने आनंदी जीवन जगता येऊ शकते. येणार्‍या आपत्काळात साधना केल्यानेच तणावमुक्त जीवन जगता येऊ शकेल, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी केले.

आधुनिक वैद्य (डॉ.) संदीप पवार आणि शीतल पवार यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी औषधे !

चिपळूण येथील पूरग्रस्तांना सनातन संस्थेकडून वैद्यकीय साहाय्य केले जात आहे. यासाठी येथील आधुनिक वैद्य (डॉ.) संदीप पवार आणि शीतल पवार यांनी ‘फेस शिल्ड’ आणि औषधे दिली.

चिपळूण (जिल्हा रत्नागिरी ) येथील पूरग्रस्तांसाठी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि स्थानिक संस्था-संघटना यांच्या वतीने ‘साहाय्यता अभियान’ !

सनातन संस्था , हिंदु जनजागृती समिती आणि स्थानिक संस्था-संघटना यांच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे.

हिंदु राष्ट्राच्या भावी पिढीला घडवण्याचे मोठे दायित्व शिक्षकांवर ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

पश्चिम महाराष्ट्र, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा येथील शिक्षकांसाठी ‘सध्याच्या कठीण काळात साधना करून आनंदी कसे रहावे ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या परिसंवादात त्या मार्गदर्शन करत होत्या. या ‘ऑनलाईन’ परिसंवादात ४०० हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते.

‘योग’ या संकल्पनेला आध्यात्मिक पाया ! – वासंती लावंघरे, सनातन संस्था

‘स्नेहमंच’च्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये ‘निरोगी आयुष्यासाठी योगसाधना ही काळाची गरज’ या विषयावर त्या बोलत होत्या.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘तणावमुक्त जीवन आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ ‘ऑनलाईन’ व्याख्यानमाला

काळानुसार योग्य साधना कशी करावी, तसेच धर्माचरणाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणारे ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षण वर्ग आणि ‘धर्मसत्संग’ यांमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले

महामारी आणि तिसरे महायुद्ध यांतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, तसेच तणावमुक्तीसाठी साधना करणे आवश्यक ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

महामारी आणि तिसरे महायुद्ध यांतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी साधनाच करणे आवश्यक आहे. आपत्काळात तणाव वाढतो. स्वयंसूचना दिल्यास तो घालवता येतो. तणावमुक्तीसाठी साधनेविना पर्याय नाही, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांनी केले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने तणावमुक्तीसाठी ‘विदर्भस्तरीय ऑनलाईन शिक्षक परिसंवाद’!

नामजप केल्याने मन स्थिर राहून आनंदी होते. तसेच भीती आणि काळजी यांविषयीचे विचार न्यून होतात. असे मार्गदर्शन सनातनचे संत पू. अशोक पात्रीकर यांनी विदर्भस्तरीय ऑनलाईन ‘शिक्षक परिसंवादा’त केले. या वेळी पू. पात्रीकरकाका यांनी कुलदेवी आणि दत्त यांच्या नामजपाचे महत्त्वही सांगितले.