सनातन संस्थेचा मंदिर स्वच्छता हा उपक्रम अतिशय चांगला ! – सौ. शोभा पाटील, नगरसेविका, भाजप

सनातन संस्थेचा मंदिर स्वच्छता हा उपक्रम अतिशय चांगला आहे. मंदिरांमध्ये सत्त्विकता आणि सकारात्मकता असतेच; मात्र तेथील स्वच्छता झाल्यामुळे त्या ठिकाणची प्रसन्नता अधिक वाढते.

सलग २० वर्षे अविरतपणे चालू असलेल्या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक !

खडकवासला ग्रामस्थ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि समविचारी संघटना यांच्या वतीने आयोजित ‘खडकवासला जलाशय रक्षण मोहीम’ २२ मार्च या दिवशी पार पडली. सलग २० वर्षे अविरतपणे चालू असलेल्या या मोहिमेचे सर्व स्तरांतून कौतुक झाले.

‘विश्व अग्निहोत्र दिन’ आणि ‘होळी’ यांच्या निमित्ताने आयोजित विशेष ‘ऑनलाईन’ प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘विश्व अग्निहोत्र दिन’ आणि ‘होळी’ यांच्या निमित्ताने सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्या विद्यमाने एका विशेष ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या प्रवचनाचा देहली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र येथील अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.

भगिनींनो, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आत्मबल वाढण्यासाठी साधनेची कास धरा ! – सौ. मोहिनी मांढरे, सनातन संस्था

आपल्यासमोर आदर्श राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राणी चेन्नम्मा, राणी लक्ष्मीबाई या वीरांगना आहेत. प्रत्येक पुरुषामागे एक स्त्री शक्तीच्या रूपाने कार्यरत असते.

सनातन संस्था आणि करवीर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य पडताळणी !

सनातन संस्था आणि करवीर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने ५ मार्च या दिवशी उंचगाव येथील श्री मंगेश्वर मंदिरात आरोग्य पडताळणी घेण्यात आली.

आवार (जिल्हा जळगाव) येथे ‘ज्ञानशक्ती वाचनालया’चे उत्साहात उद्घाटन !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘पहिल्या ज्ञानशक्ती वाचनालयाचे’ उद्घाटन जळगाव जिल्ह्यातील आवार या गावात करण्यात आले. हे ग्रंथालय ग्रामस्थांसाठी विनामूल्य उपलब्ध आहे.

मनाची दुर्बलता नष्ट करून त्याला सबळ बनवण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करणे अत्यावश्यक ! – सौ. क्षिप्रा जुवेकर, सनातन संस्था

शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव अंतर्गत ला.ना. माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी ‘अध्यापक प्रबोधिनी’ उपक्रमांतर्गत कार्यक्रमास सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना आमंत्रण

सनातन संस्थेच्या वतीने गरीब मुलांना सनातनच्या ‘संस्कार वह्या’ आणि ग्रंथ यांचे विनामूल्य वितरण

सनातन संस्थेच्या वतीने वेळोवेळी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.

स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेमुळे सातत्याने आनंदी रहाता येणे शक्य ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपण करत असलेल्या नामजपादी साधनेसमवेत आपल्यातील स्वभावदोषांचे निर्मूलनही अत्यावश्यक आहे. आपल्या दोषांमुळे आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आपण नियमितपणे स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवल्यास आपल्याला सातत्याने आनंदी रहाणे शक्य आहे.

‘सीबर्ड ट्रान्सपोर्ट’च्या कर्मचार्‍यांसाठी सनातन संस्थेच्या वतीने ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर शिबिर

खरा आनंद भगवंताच्या नामजपात आहे. आपण आध्यात्मिक आणि लौकिक प्रगतीसाठी स्वतःच्या कुलदेवतेचा नामजप करावा. स्वतःचे कार्य प्रामाणिकपणे केले, तर भगवंताची कृपा प्राप्त होऊन व्यावहारिक आणि कौटुंबिक जीवनात यश मिळते.