सनातन संस्थेच्या वतीने पुणे येथील विद्यार्थांसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन तसेच महिलांसाठी प्रथमोपचार उपक्रमाचे यशस्वी आयोजन !
सनातन संस्थेच्या वतीने सामाजिक जाणीव जोपासली जावी आणि समाजाला त्याचा अधिकाधिक लाभ व्हावा या उद्देश्याने आरोग्य तपासणी,मंदीर स्वच्छता,गरजूंना अन्नदान,शालेय साहित्य वाटप अश्या प्रकारचे विविध उपक्रम नियमितपणे घेतले जातात. पुणे येथील इ. ८ वी च्या विद्यार्थांसाठी 11 मार्च या दिवशी आरोग्य विषयक मार्गदर्शन हा उपक्रम घेण्यात आला.