युवा पिढीला सुसंस्कारीत आणि आदर्श करण्याच्या उद्देशाने जळगाव येथे सनातनच्या सेवाकेंद्रात युवा शिबीर

जळगाव येथील सनातनच्या सेवाकेंद्रात २६ ते २९ जानेवारी या कालावधीत युवा पिढीला सुसंस्कारीत आणि आदर्श करण्याच्या उद्देशाने युवा शिबीर घेण्यात आले. त्यात नाशिक, जळगाव, संभाजीनगर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, नंदुरबार, धुळे येथील युवा साधकांनी सहभाग घेतला.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात तीन दिवसीय ‘प्रथमोपचार प्रशिक्षण शिबीर’

प्रथमोपचार प्रशिक्षणासह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वैद्यकीय क्षेत्रात व्यापक संघटन करावे, असे प्रतिपादन सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी येथील ‘प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिरा’तील शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले.

सनातन संस्थेच्या आश्रमांमध्ये युवा पिढीसाठी मार्गदर्शन

युवा साधक प्रशिक्षण शिबीराच्या माध्यमातून साधनेचा पाया भक्कम होईल ! – सौ. संगीता घोंगाणे, प्रसारसेविका

रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमात युवा साधकांना साधना व व्यक्तिमत्त्व विकास यांवर मार्गदर्शन

शिबिराच्या कालावधीत युवा साधकांना धर्माचरणाचे महत्त्व, साधनेत भावजागृतीचे महत्त्व, वाईट शक्तींचा त्रास आणि त्यावरील आध्यात्मिक उपाय या विषयांवर मार्गदर्शन अन् सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देण्यात आली.

नागपूर, यवतमाळ आणि अमरावती येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने प्रवचने आणि शौर्य जागरण प्रात्यक्षिके सादर

हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने येथे पाच ठिकाणी शौर्य जागरण प्रात्याक्षिके अन् अन्य ठिकाणी नवरात्र आणि दसर्‍याचे महत्त्व, तर एका ठिकाणी नारी, तू अबला नाही, सबला हो याविषयी व्याख्यान, तर दोन ठिकाणी धर्मशिक्षणविषयक फ्लेक्स प्रदर्शनही लावण्यात आले.

सनातन संस्थेकडून जुन्नर येथील नगर वाचनालयास सनातन-निर्मित ७२ ग्रंथांचा संच भेट

जुन्नर (जिल्हा पुणे) येथील नगर वाचनालयाला सनातन संस्थेकडून सनातनने प्रकाशित केलेल्या ७२ ग्रंथांचा संच भेट देण्यात आला. धर्मशिक्षण, बालसंस्कार, अध्यात्म-धर्म, आयुर्वेद आदी विषयांवरील ग्रंथांचा यामध्ये समावेश आहे.

मुलींवरील वाढत्या अत्याचारात मुलींचे अयोग्य वागणे हाही एक प्रमुख घटक ! – अधिवक्त्या अपर्णा रामतीर्थकर

या वेळी बोलतांना सनातन संस्थेच्या सौ. वैशाली राजहंस म्हणाल्या, हिंदु धर्मात सांगण्यात आलेल्या प्रत्येक कृतीमागे शास्त्र आहे. या शास्त्राचे पालन करणे म्हणजेच धर्माचरण होय !

समाजकल्याण

सध्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, न्यायालयीन अशा सर्वच क्षेत्रांत आढळून येणारा अन्याय आणि गैरप्रकार यांनी सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. ही स्थिति बदलण्यासाठी सनातन संस्था कटिबद्ध आहे.