पुणे येथील खडकवासला धरणाचे प्रदूषण रोखण्यासाठीच्या मानवी साखळीत सनातन संस्थेचा सहभाग !
गेली १६ वर्षे राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण यांसाठीचा हा उपक्रम हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्याकडून यशस्वीपणे चालू आहे.
गेली १६ वर्षे राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण यांसाठीचा हा उपक्रम हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था यांच्याकडून यशस्वीपणे चालू आहे.
साधक हा नम्र, इतरांचा विचार करणारा, स्वतःची चूक स्वीकारणारा, सत्य बोलणारा, निरपेक्ष प्रेम करणारा, व्यष्टी साधना तळमळीने करणारा असतो. म्हणूनच आपल्यात साधकत्व येण्यासाठी गुणांची जोपासना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांनी युवा शिबिरार्थींना केले.
पंढरपूर येथील चंद्रभागा नदी स्वच्छतेविषयी अनेक समस्या दिसून येत आहेत. त्याविषयी येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अभिजीत बापट यांना निवेदन देण्यात आले.
डॉ. लहाने समितीने गेल्या तीन वर्षांत एकाही रुग्णालयाची पडताळणी केलेली नाही कि शासनाला कसलाही अहवाल सादर केलेला नाही. शासनाची याविषयीची अनास्था चिंताजनक आहे.
युरोपमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रशासन सांभाळते आणि नीती-सदाचार व्यवस्था चर्च सांभाळते. भारतात धर्मसंस्था किंवा धर्मगुरु यांना कोणतीही वैधानिक मान्यता नाही. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थसह नीती-सदाचार व्यवस्था सांभाळण्याचे अतिरिक्त उत्तरदायित्व प्रशासनाकडे देण्यात आले आहे.
ताण घालवण्यासाठी विविध शारीरिक, मानसिक, बौद्धिक उपाय योजनांसमवेत आध्यात्मिक उपाय म्हणजेच साधनाही आवश्यक आहेत. ही साधना आपल्याला सतत आनंदी रहायला शिकवते, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी केले.
जळगाव येथील सनातनच्या सेवाकेंद्रात २६ ते २९ जानेवारी या कालावधीत युवा पिढीला सुसंस्कारीत आणि आदर्श करण्याच्या उद्देशाने युवा शिबीर घेण्यात आले. त्यात नाशिक, जळगाव, संभाजीनगर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, नंदुरबार, धुळे येथील युवा साधकांनी सहभाग घेतला.
प्रथमोपचार प्रशिक्षणासह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वैद्यकीय क्षेत्रात व्यापक संघटन करावे, असे प्रतिपादन सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी येथील ‘प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिरा’तील शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले.
युवा साधक प्रशिक्षण शिबीराच्या माध्यमातून साधनेचा पाया भक्कम होईल ! – सौ. संगीता घोंगाणे, प्रसारसेविका
शिबिराच्या कालावधीत युवा साधकांना धर्माचरणाचे महत्त्व, साधनेत भावजागृतीचे महत्त्व, वाईट शक्तींचा त्रास आणि त्यावरील आध्यात्मिक उपाय या विषयांवर मार्गदर्शन अन् सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देण्यात आली.