सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील पूरग्रस्तांना साहाय्य

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भडगाव येथील महादेव मंदिर येथे ६२ पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली.

सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून महाराष्ट्र अन् कर्नाटक येथील पूरग्रस्तांना साहाय्य, तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप !

कर्नाटक राज्याचे सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांच्या शुभहस्ते पूरग्रस्तांना वस्तूंचे वाटप करण्यात आले.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून कोल्हापूर, तसेच सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्तांना भोजन अन् वैद्यकीय साहाय्य !

सनातन संस्थेतर्फे २०० हून अधिक रुग्णांची सर्दी, खोकला, अंगदुखी आणि पावसामुळे होणारे त्वचेचे आजार याविषयी तपासणी करून औषधे देण्यात आली.

सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांनी केले पूरग्रस्तांना साहाय्य

११ ऑगस्ट या दिवशी हातकणंगले तालुक्यातील चावरे या ठिकाणी पूरग्रस्तांना अन्नदान करण्याची सेवा सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शरदिनी कोरे आणि आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी केले.

सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून कोल्हापूर, सांगली यांसह कर्नाटकातील बेळगाव, दक्षिण कन्नड येथील पूरग्रस्तांना साहाय्य !

पुरात अडकून पडलेल्या लोकांना साहाय्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह समाजातून अनेक सामाजिक, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटना पुढे सरसावल्या आहेत.

सनातन संस्थेचा कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात सक्रीय सहभाग

सनातनच्या साधिका सौ. सुरेखा काकडे यांच्याकडे दोन धर्मप्रेमी महिलांनी त्यांचे घर पावसामुळे घर गळत असल्याने साहाय्य मागितले. यावर श्री. आणि सौ. काकडे यांनी त्या दोन्ही महिलांना स्वतःच्या घरी आणून रात्री भोजन दिले.

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत ! – आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे, सनातन संस्था

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी २८ जुलै या दिवशी शिरोली येथील म्हसोबा मंदिरात ‘हिंदु संस्कृतीचे महत्त्व आणि लव्ह जिहादचा वाढता धोका’, या विषयावर मार्गदर्शन करतांना केले.

भुसावळ (जळगाव) येथे ‘आनंद प्राप्तीसाठी साधना’ या विषयावर प्रवचन

जळगाव येथील विठ्ठल मंदिरात २२ जुलै या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता ‘आनंद प्राप्तीसाठी साधना’ या विषयावर सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले.

भारतभूषण प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी गुरुंचे महत्त्व या विषयावर सनातन संस्थेतर्फे प्रवचन

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मिरज येथील भारतभूषण प्राथमिक विद्यालय येथे सनातन संस्थेच्या साधिका सौ. तनुजा पडियार यांचे ‘गुरुपौर्णिमेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन झाले.

पिंप्री येथे सनातन संस्थेचे युवा शौर्य जागरण शिबिर

पिंप्री (जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘युवा शौर्यजागरण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय आणि कार्य यांची ओळख करून दिली. त्यानंतर ‘स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आणि शौर्यजागरण’ या विषयावर मार्गदर्शन केले.