धुळे, मुंबई आणि पुणे येथील ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्य आणि चैतन्य यांचा आविष्कार !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७ मे या दिवशी झालेल्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’च्या अंतर्गत २० मे या दिवशी धुळे, मुंबई आणि पुणे या तिन्ही ठिकाणी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते.

बोईसर आणि कोपरखैरणे येथे मंदिरांची स्वच्छता !

बोईसर येथील हनुमान मंदिराची स्वच्छता धर्मप्रेमी आणि साधक यांनी केली. या वेळी मंदिर विश्‍वस्तांनी मंदिरात साकडे घालण्यासाठी अनुमती दिली. कोपरखैरणे येथील श्री चिकानेश्‍वर शिव मंदिराचीही स्वच्छता करण्यात आली.

जळकोट (जिल्हा नांदेड) येथे सनातन संस्थेकडून भागवत सप्ताहात मार्गदर्शन

जळकोट – येथील सनातन संस्थेचे हितचिंतक आणि विज्ञापनदाते, तसेच जळकोट पंचायत समितीचे बांधकाम सभापती श्री. रमाकांत रायवार यांनी आयोजिलेल्या भागवत सप्ताहात सनातन संस्थेच्या सौ. अनिता बुणगे यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले होते.

भारतीय संविधानात ‘सेक्युलर’ या शब्दाची कुठलीही व्याख्या नाही ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

प्रत्यक्षात ‘सेक्युलर’ या शब्दाची कोणतीही व्याख्या किंवा अर्थ भारतीय संविधानात दिलेला नाही. त्यामुळे ‘सेक्युलर’ शब्दाचे ‘धर्मनिरपेक्षता’, ‘सर्वधर्मसमभाव’, ‘लौकिकवाद’ असे विविध प्रकारचे अर्थ आज अनेकांनी काढले आहेत.

जळगाव जिल्ह्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या विरोधात विविध उपक्रमांद्वारे प्रबोधन

सनातन संस्थेचे श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी धर्मचरणाचे महत्त्व, तसेच धर्मरक्षणासाठी सर्वांनी संघटित होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

पाश्‍चिमात्य संस्कृती आणि विचार यांपासून रक्षण करण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

आज हिंदू पाश्चिमात्य संस्कृती आणि विचार यांना बळी पडत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी ‘नारीशक्ती’ या विषयावरील आयोजित कार्यक्रमात केले.

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त होणारे अपप्रकार रोखा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

नवी देहली व्हॅलेंटाईन डे’ म्हणजेच १४ फेब्रुवारी या दिवशी समाजात विशेषत: शाळा आणि महाविद्यालये येथे होणारे अपप्रकार रोखावेत, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितिीच्या वतीने नोएडाचे जिल्हाधिकारी महेंद्रकुमार सिंह यांना नुकतेच देण्यात आले.

हिंदु धर्मजागृती सभेत सनातन संस्थेचे श्री. संजय कुमार सिंह यांचे धर्माचरणाची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन

लोहता भागातील हनुमान मंदिर येथे २८ जानेवारीला हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. या वेळी सनातन संस्थेचे श्री. संजय कुमार सिंह यांनी धर्माचरणाची आवश्यकता या विषयावर मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत म्हापसा (गोवा) येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने !

पेडणे येथील कार्निव्हल रहित करावा. समानस्तरावर लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन यांसाठी तातडीने कायदा करावा व मागण्यांना अनुसरून समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली २८ जानेवारी या दिवशी म्हापसा नगरपालिका बाजार येथे निदर्शने केली.

मध्यप्रदेशमधील पलिया पिपरिया येथे श्रीमद्भक्तमाल कथेच्या कार्यक्रमात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्र आणि धर्म यांविषयी मार्गदर्शन

पिपरिया येथील भाजपचे श्री. मनोहरलालजी बँकर यांनी आयोजित केलेल्या कथेच्या कार्यक्रमातही हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने धर्मशिक्षणाविषयीचे फलक, ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावून जनजागृती करण्यात आली.