हिंदूंच्या तीर्थस्थळांचा अवमान करणार्‍या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटावर बंदी घाला ! – हिंदूंची एकमुखी मागणी

‘केदारनाथ’ या आगामी हिंदी चित्रपटाचे नाव, पोस्टर, ‘ट्रेलर’ आणि ‘टीझर’ यांतून हा चित्रपट हिंदुद्रोही असल्याचे दिसून येते.

वणी, यवतमाळ आणि नागपूर येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग !

येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने स्थानिक दत्त चौकात ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले. या वेळी ३०० हून अधिक हिंदूंनी स्वाक्षर्‍यांद्वारे प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. आंदोलनातील विषय ऐकून जिज्ञासू स्वाक्षरी करण्यासाठी येत होते.

हिंदूंनो, धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करण्यातच मनुष्य जीवनाची सफलता ! – सौ. नयना भगत, प्रवक्त्या, सनातन संस्था

संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती होत आहे. त्यामुळे हिंदु धर्माचे धर्मशिक्षण घेऊन त्याप्रमाणे आचरण केल्यानेच जीवन सफल होईल, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी केले.

शबरीमला देवस्थान हा केवळ केरळी लोकांचा विषय नसून समस्त हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्‍न आहे ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सरकार शबरीमला मंदिरात परंपरेच्या विरोधात जाऊन महिलांना मंदिरात प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करत आहे, जे पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार चुकीचे आहे.

हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी धर्माचरण आणि साधना आवश्यक ! – डॉ. पूनम शर्मा, सनातन संस्था, विलासपूर

नामजपातून धर्मरक्षणासाठी आपल्यामध्ये आत्मबळ निर्माण होईल, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक बळ मिळेल, असे उद्गार सनातन संस्थेच्या डॉ. पूनम शर्मा यांनी ‘साधनेचे महत्त्व’ या विषयावर बोलतांना काढले.

बेळगाव येथील सनातनचे साधक प्रसाद हळदणकर यांनी ‘हॅगो’वर होणारे श्री दुर्गादेवीचे विडंबन रोखले !

‘हॅगो’ हे एक ऑनलाईन गेमचे (खेळाचे) ‘अ‍ॅप्लिकेशन’ आहे. यावर एकाच वेळी ३ लक्षांपेक्षा अधिक ग्राहक जोडलेले असतात. हे ‘अ‍ॅप्लिकेशन’ उघडल्यावर त्यावर श्री दुर्गादेवीचे विडंबनात्मक चित्र असल्याचे सनातनचे साधक श्री. प्रसाद हळदणकर यांना लक्षात आले.

डोंबिवली येथील शबरीमला मंदिरप्रवेश प्रकरणी काढलेल्या निषेध फेरीत सनातन संस्थेचा सहभाग

तुम्हाला किती लोकांना हिंदूंच्या धार्मिक पुस्तकांविषयी माहिती आहे ? धर्मग्रंथांतील विचार वर्षानुवर्षे चालू आहेत. एका झटक्यात ते बदलू शकत नाहीत. अन्य धर्मियांच्या संदर्भात असे होत नाही; त्यांच्यावर अन्याय झाला की ते एकत्र येतात.

नागपूर येथे नवरात्रोत्सवातील अपप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाप्रसंगी सनातन संस्थेचा सहभाग

येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नवरात्रोत्सवात होणारे अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा करण्याविषयीचे  निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी श्री रवींद्र खंजाजी यांना ४ ऑक्टोबर या दिवशी देण्यात आले.

स्वसंस्कृती आणि स्वधर्म यांचा विसर पडलेला समाज अन् संस्कृतीजतन आणि धर्माचरण यांस उद्युक्त करण्यासाठी प्रयत्नरत सनातन संस्था !

सध्याच्या काळात समाजातील सात्त्विकता पुष्कळच उणावली असून साधना करणे कठीण झाले आहे. समाजाला अध्यात्माचे महत्त्व सांगून समाज साधनेकडे वळावा आणि समाजातील सात्त्विकता पुनर्प्रस्थापित व्हावी, यासाठी सनातनचे साधक अन् संत प्रयत्न करत आहेत.

सनातन संस्थेच्या वतीने ठाणे आणि बदलापूर येथे ‘आदर्श गणेशोत्सव’ या विषयावर प्रवचन !

डीजेवर चित्रपटांची गाणी लावून मद्य पिऊन धांगडधिंगा करत मिरवणुका काढणे, प्रदूषणकारी कागदी लगद्याच्या मूर्ती पर्यावरणपूरक म्हणून बसवणे, मूर्तीदान करणे, जागरणाच्या नावाखाली जुगार खेळणे यांसारख्या अनेक विकृतींमुळे पावित्र्य भंग होत आहे.