श्री गणेशोत्सवाच्या संदर्भातील धर्मशास्त्र सांगणे, हा स्तुत्य उपक्रम ! – शिक्षकांची प्रतिक्रिया
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल (स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था) येथे श्री गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेश या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये शास्त्रानुसार गणेशमूर्ती कशी असावी ? त्याचे पूजन कसे करावे ? श्री गणेशाची कृपा आपल्यावर होण्यासाठी या काळात कसे प्रयत्न करावेत ?याविषयी विस्तृत माहिती सांगण्यात आली.