सनबर्न फेस्टिव्हलच्या याआधीच्या कार्यक्रमांमध्ये अमली पदार्थांचा मुक्त व्यापार चालू होता – श्री. शंभू गवारे, सनातन संस्था

पाश्‍चात्त्य विकृतीचे उदात्तीकरण करणार्‍या ‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात चांदणी चौकात बावधन, लवळे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

धर्म, राष्ट्र आणि समाज यांची व्यवस्थित घडी बसवणे म्हणजेच हिंदु राष्ट्र होय – सौ. विदुला हळदीपूर, सनातन संस्था

सध्या हिंदु संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात अवमान केला जात आहे. धर्माचरणानेच धर्माची पुनर्स्थापना होणार आहे. त्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. धर्म, राष्ट्र आणि समाज यांची व्यवस्थित घडी बसवणे म्हणजेच हिंदु राष्ट्र होय.

वादग्रस्त जादूटोणाविरोधी कायद्याची शासकीय समिती विसर्जित न केल्यास राज्यभर आंदोलन !

तत्कालीन काँग्रेस सरकारने जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठी नेमलेल्या शासकीय समितीचे (PIMC) सहअध्यक्ष श्याम मानव, सदस्य अविनाश पाटील, मुक्ता दाभोलकर, माधव बागवे, छाया सावरकर आदी वादग्रस्त आहेत. त्यांच्या ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झालेले आहेत.

देवतांची चित्रे असलेले, तसेच चिनी बनावटीचे फटाके यांवर बंदी घाला ! – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवेदनाद्वारे मागणी

देवतांची चित्रे असलेल्या, तसेच चिनी बनावटीच्या फटाक्यांची निर्मिती आणि विक्री सरकारने थांबवावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने एका निवेदनाद्वारे जिल्ह्यातील पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली आहे

पुणे जिल्ह्यामध्ये सनातन संस्थेचा नवरात्रोत्सवातील धर्मप्रसार !

नुकत्याच पार पडलेल्या नवरात्रोत्सवामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी राबवण्यात आलेल्या उपक्रमांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विजयादशमीनिमित्त पुणे येथे दुर्गामाता दौडीत सनातन संस्थेचा सहभाग !

विजयादशमीच्या दिवशी येथील पाषाण भागात घेण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीत सनातन संस्थेच्या साधकांनी सहभाग घेतला.प्रवीण नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आरती केली.

कलियुगात नामस्मरण हीच काळानुसार साधना आहे – सौ. प्राची जुवेकर, सनातन संस्था

हज यात्रेला सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले जाते, तर विन्ध्याचलमध्ये नवरात्रीच्या मेळाव्याकरता येणार्‍या यात्रेकरूंच्या तिकिटांवर अधिभार वाढवण्यात येतो, हा धर्मनिरपेक्षतेच्या नावावर हिंदूंवर अन्याय आहे, त्यामुळे हिंदूंनी जागृत झाले पाहिजे.

नागपूर, यवतमाळ आणि अमरावती येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने प्रवचने आणि शौर्य जागरण प्रात्यक्षिके सादर

हिंदु जनजागृती समिती आणि रणरागिणी शाखा यांच्या वतीने येथे पाच ठिकाणी शौर्य जागरण प्रात्याक्षिके अन् अन्य ठिकाणी नवरात्र आणि दसर्‍याचे महत्त्व, तर एका ठिकाणी नारी, तू अबला नाही, सबला हो याविषयी व्याख्यान, तर दोन ठिकाणी धर्मशिक्षणविषयक फ्लेक्स प्रदर्शनही लावण्यात आले.

महाराष्ट्र : सनातन संस्थेद्वारे राबवण्यात आलेल्या आदर्श नवरात्रोत्सव मोहिमेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भांडुप येथील साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक श्री. संजय गोठिवडेकर यांच्या घरी डॉ. लक्ष्मण जठार यांनी प्रवचन घेतले. प्रवचनाला श्री. गोठिवडेकरांचे १२ नातेवाईक उपस्थित होते. प्रवचनानंतर सर्वांनी नवरात्रीचे अध्यात्म शास्त्रीयज्ञान मिळाल्याने आनंद व्यक्त केला.

श्राद्ध केल्याने पितरांना लवकर सद्गती प्राप्त होते – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

श्राद्ध हे तिथीनुसारच करायला हवे. हे विधी आपल्या कुवतीप्रमाणे केल्यास पितरांचा आशीर्वाद प्राप्त होऊन सुखसमद्धी लाभते, असे प्रतिपादन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.