हिंदु धर्मावर होणारे विविध आघात रोखण्यासाठी जनजागृती महत्त्वाची ! – सदगुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

हिंदूंच्या समस्यांविषयी सातत्याने हिंदु समाजामध्ये जागृती घडवून आणून त्याचा हिंदूंनी संघटितपणे प्रतिकार केला पाहिजे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

पुणे, मिरज येथे गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या शोभायात्रेत सनातन संस्था सहभागी !

‘जय श्रीरामा’च्या जयघोषात आणि ढोल- ताशांच्या गजरात शहरात ९ एप्रिल या दिवशी गुढीपाडव्याच्या निमित्ताने उत्साही वातावरणात शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी उत्साही वातावरणात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

चला, रामराज्याच्या दिशेने वाटचाल करूया !

श्रीरामजन्मभूमीवर 490 वर्षांच्या वनवासानंतर भव्य श्रीराममंदिर उभे रहात आहे. संपूर्ण देशातच नव्हे, तर जगभरातील हिंदूंमध्ये उत्साहाचा संचार झाला आहे. अमेरिकेमध्ये हिंदूंकडून श्रीराममंदिरानिमित्त फेर्‍या काढण्यात येत आहेत. संपूर्ण भारत राममय झाला आहे. 22 जानेवारी जशी जवळ येत आहे, तशी भारतियांमध्ये रामभक्तीची ज्योत अधिक तेजस्वीपणे तेवू लागत आहे

सनातन संस्थेच्या वतीने श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत !

सनातन संस्थेच्या वतीने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दौडीचे स्वागत सनातन संस्थेच्या साधिका सौ. नीता दामले आणि सौ. प्रतिक्षा जोशी यांनी केले.

सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा द्या ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सद्य:स्थितीत भारतामध्ये ख्रिस्ती मिशनरी, कम्युनिस्ट, जिहादी आणि तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी या शक्ती सनातन धर्माला नष्ट करण्यासाठी एकत्र कार्यरत आहेत.

राष्ट्रहिताला मारक असणारी आणि सनातन धर्माला विरोध करणार्‍यांची जमात एकच ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

उदयनिधी यांच्या विरोधात आम्ही गप्प का आहोत ? जितेंद्र आव्हाड, प्रियांक खर्गे, निखिल वागळे हे सगळे उदयनिधींची ‘री’ ओढत आहेत, तरीही सनातन धर्मीय गप्प का?

वाराणसी (उत्तरप्रदेश) न्‍यायालयाच्‍या आवारात सनातन संस्‍थेच्‍या धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाचे आयोजन

वाराणसी येथील न्‍यायालयाच्‍या आवारात ‘रुद्राभिषेक’ आयोजित करण्‍यात आला होता. यानिमित्त सनातन संस्‍थेच्‍या वतीने धर्मशिक्षण देणार्‍या फ्‍लेक्‍स फलकांचे प्रदर्शन लावण्‍यात आले.

अमरावती येथे ‘कलश जागृती यात्रे’त सनातनचा सहभाग

या कलश यात्रेचा उद्देश ‘घराघरात यज्ञ व्‍हावे, गोमातेला राष्‍ट्रमाता म्‍हणून घोषित करण्‍यात यावे आणि ‘संस्‍कृत भाषा हीच आपली संस्‍कृती आहे’ याचा प्रचार करणे हा आहे’, असे आयोजक श्री. प्रकाश सिरवानी यांनी या वेळी सांगितले.

हिंदु राष्ट्र स्थापनेत कितीही अडचणी आल्या, तरी आम्ही सतत पुढे जात रहाणार ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

प्रारब्धानुसार प्रत्येकाला सुख-दु:ख भोगावे लागते. धर्मकार्य करत असतांना कधी कधी पोलिसांचा दबाव असतो. काही वेळा समाजाचाही विरोध होतो. आपली साधना असल्यास अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्थिर रहाता येते. तसेच आपले कार्य अखंड चालू ठेवता येते.

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या उपासनेने हिंदु राष्ट्राची स्थापना करणे शक्य ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक संत, सनातन संस्था

आध्यात्मिक साधना केल्याने आत्मविश्वास जागृत होतो आणि व्यक्ती तणावमुक्त जीवन जगू शकते. साधना करून आपण आपल्या कृतीच्या फळाची अपेक्षा न ठेवता कार्य करू शकतो आणि प्रत्येक कृतीतून आनंद मिळवतो.