देहली येथील ‘जागतिक पुस्‍तक मेळाव्‍या’त सनातन संस्‍थेचा सहभाग

देहली येथील भारत मंडपम् येथे ‘जागतिक पुस्‍तक मेळाव्‍या’चे आयोजन करण्‍यात आले होते. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या पुस्तक मेळ्याचे उद्घाटन राष्ट्‍रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले.

इंदूर (मध्‍यप्रदेश) येथील ‘तरुण जत्रे’मध्‍ये सनातन संस्‍थेच्‍या वतीने अध्‍यात्‍मप्रसार

इंदूर (मध्‍यप्रदेश) – येथील दसरा मैदानावर ‘तरुण जत्रे’चे (‘फूड फेस्‍टिव्‍हल’चे) आयोजन करण्‍यात आले होते. या मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने अध्यात्म, धर्मजागृती आणि राष्ट्‍ररक्षण या विषयांवरील ग्रंथ प्रदर्शन, तसेच हिंदु धर्म संस्कृतीविषयी वैज्ञानिक माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.

हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान जोपासणे आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

धर्मशिक्षणाअभावी हिंदू पाश्चिमात्य विकृतीच्या आहारी जात आहेत. महिला धर्मपालन करत नसल्याने त्यांना अत्याचारांना सामोरे जावे लागते. तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. हिंदूंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माभिमान जोपासणे आवश्यक आहे, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

हिंदूंनी नामजप आणि धर्मपालन केल्यास लाभ निश्चित ! – सद्गुरु स्वाती खाडये, सनातन संस्था

कलियुगात प्रत्येक जण आनंद मिळवण्यासाठी धडपडतो; मात्र आज प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात विविध त्रासांना सामोरे जावे लागते. या त्रासातून बाहेर पडण्यासाठी नामस्मरण आवश्यक आहे आणि आपल्या कुलदेवीचा नामजप केल्यास प्रारब्ध सुसह्य होण्यास साहाय्य होते….

आनंदी जीवनासाठी साधनेविना तरणोपाय नाही ! – सद़्‍गुरु स्‍वाती खाडये, सनातन संस्‍था

सध्‍या मनुष्‍याचे जीवन तणावपूर्ण आणि धावपळीचे झाले आहे. तणावमुक्‍त आणि आनंदी जीवन जगायचे असेल, तर साधनेविना तरणोपाय नाही, असे मार्गदर्शन सनातनच्‍या धर्मप्रचारक सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी केले.

आनंदप्राप्तीसाठी धर्माचरण आवश्यक ! – सद्गुरु अनुराधा वाडेकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

लहान वयातच मुलांवर योग्य संस्कार करणे अत्यंत आवश्यक असून या संस्कारांमुळे केवळ त्यांनाच नव्हे, तर पुढे त्यांच्या कुटुंबियांनाही चिरंतन आनंद मिळेल. शाळेतील शिक्षणामुळे एकवेळ पैसा कमवण्याचा मार्ग मिळेल; पण धर्माचरण आणि योग्य संस्कार यांमुळे त्यांच्या भावी आयुष्याचा पाया पक्का होईल….

नवी मुंबईतील सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला मान्यवरांच्या भेटी !

सीवूड (नेरूळ) येथे ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई आणि क्रेडाई बी.ए.एन्.एम्. रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने २३ वे मालमत्ता प्रदर्शन २४ ते २७ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

धर्माचे शिक्षण न दिल्यामुळेच हिंदु युवती धर्मांधांच्या वासनांना बळी पडत आहेत ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदूंच्या महिला आणि युवती यांना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे शारीरिक आणि मानसिक शोषण करून जीवन उद्ध्वस्त केले जात आहे. हे एक हिंदूंचा वंश संपवण्याचे षड्यंत्र असून धर्माचे शिक्षण न दिल्यामुळेच हिंदु युवती धर्मांधांच्या वासनांना बळी पडत आहेत, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.

काश्मिरी हिंदूंच्या पुनर्वसनासाठी जम्मू-काश्मीरमध्ये पनून कश्मीर ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनानंतरही ते स्वतःच्या देशात निर्वासित म्हणून रहात आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आमची मागणी आहे की, निर्वासित काश्मिरी हिंदूंसाठी जम्मू-काश्मीरमध्ये ‘पनून कश्मीर’ (आपले काश्मीर) नावाचा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनवण्यात यावा.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात पार पडला ‘आयुष्य होम’ आणि ‘देवी होम’ !

वसंत पंचमी, म्हणजे सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचा प्रकटदिन ! अशा या शुभदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात २ फेब्रुवारी २०२५ या दिवशी ‘आयुष्य होम’ आणि ‘देवी होम’ पार पडला.